Devendrabhai, when I was an MLA, you were going to school in half a bunch! | देवेंद्रभाई, मी आमदार असताना तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होता!
देवेंद्रभाई, मी आमदार असताना तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होता!

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : माझी चूक नसताना मला तुरुंगात टाकले़ आता मुख्यमंत्री मला धमकी देत आहेत़ माझा या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की, मी आमदार, महापौर असताना देवेंद्रभाई, आपण हाफ चड्डीत शाळेत जात होता़ मग आता तुम्हाला विचारून भाषण करू का?, असा परखड सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला़
श्रीगोंदा येथे लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत भुजबळ म्हणाले, भाजपने पहिल्या गांधींना आधी संपविले आणि त्यानंतर नगरमधील गांधींनाही याच भाजपने राजकारणातून संपविले़ भाजपमधील टोळीने आमची पोरं पळवली आणि त्यांना उमेदवाऱ्या दिल्या़ ज्यांना पाच वर्षात स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाही ते विकास काय करणार? पुलवामा प्रकरणात जवान शहीद झाले हे मोदी सरकारचे पाप आहे़ अभिनंदनला सोडण्यावर मोदी ५६ इंची छाती फुगवतात़ मग, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधून का सोडून आणले नाही़
बिगर निमंत्रणाचे पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाणाऱ्यांनी कशाला देशप्रेमाच्या गप्पा माराव्याता?, असा टोलाही भुजबळ यांनी लगावला़ संग्राम जगताप म्हणाले, तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करणाºया श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला एकदा संधी द्यावी़


Web Title: Devendrabhai, when I was an MLA, you were going to school in half a bunch!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.