Ramdas Athawale : "पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 03:27 PM2021-05-08T15:27:12+5:302021-05-08T15:31:00+5:30

Ramdas Athawale : हा मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

"The decision to deny reservation in promotion is unfair to the backward classes" - Ramdas Athawale | Ramdas Athawale : "पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा"

Ramdas Athawale : "पदोन्नतीमध्ये आरक्षण नाकारणारा निर्णय मागासवर्गीयांवर अन्याय करणारा"

googlenewsNext
ठळक मुद्दे'मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये 33 टक्के आरक्षण देणारा निर्णय लवकरात लवकर घ्यावा'

मुंबई : मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा. याबाबतच्या उपसमीतीने मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील 33 आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये 33 टक्के आरक्षण देणारा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठवित आहोत, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

पदोन्नतीमधील मागासवर्गीयांच्या 33 टक्के राखीव जागा रद्द करणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारचा मागासवर्गीयांविरोधी खरा चेहरा उघड झाला असून महाविकास आघाडी ही मागासवर्गीयांच्या विरोधातील आघाडी आहे, असा आरोप करत यासाठी 6 लाख मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी वर्गातून विरोध असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

(कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल)

सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांना  पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. त्यानुसार याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने गेल्या 20 एप्रिल 2021 रोजी शासन निर्णय घेऊन मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये 33 टक्के जागा आरक्षित केल्या होत्या. मात्र मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कोणतेही कारण नसताना राज्य सरकारने तडकाफडकी निर्णय घेऊन मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय जारी करणे, हा मागासवर्गीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार आहे. या निर्णयाचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

("जगात नाचक्की! मोदींना राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल", शिवसेनेची खोचक टीका)

याचबरोबर, तमाम शासकीय मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील हक्काच्या 33 टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा शासन निर्णय त्वरित घ्यावा याबाबत आपण मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र पाठविणार आहोत असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
 

Web Title: "The decision to deny reservation in promotion is unfair to the backward classes" - Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.