CoronaVirus News: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, फिल्डवर दिसत नाहीत; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 09:12 AM2021-04-29T09:12:19+5:302021-04-29T09:13:00+5:30

CoronaVirus News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर का पडत नाहीत? विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

CoronaVirus News aditya thackeray explains why cm uddhav thackeray prefer work from home | CoronaVirus News: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, फिल्डवर दिसत नाहीत; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

CoronaVirus News: ...म्हणून मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, फिल्डवर दिसत नाहीत; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

Next

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत. वर्षा निवासस्थानात बसून राज्यातील परिस्थिती कळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय, अशा प्रकारची टीका विरोधकांकडून सातत्यानं सुरू आहे. गेल्या काही दिवसांत राज्यांत काही अप्रिय घटना घडल्या. रुग्णालयांत झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला नाही. दुर्घटनेत नातेवाईक गमावलेल्या व्यक्तींचं सांत्वन केलं नाही. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. या टीकेला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय; पोलीसही घेणार कडक भूमिका

कुठेही दुर्घटना घडली की तिथे लगेच पोलीस, अग्निशमन दल पोहोचतं. तिथली स्थानिक यंत्रणा तिथे पोहोचते. त्यांच्याकडून मदतकार्य सुरू होतं. अशा ठिकाणी व्हीआयपी गेल्यावर तिथल्या मदतकार्यावर परिणाम होतो. मदतकार्यास विलंब होतो, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसांत काही अप्रिय घटना घडल्या. तिथे आरोग्यमंत्री, पालकमंत्री पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या ठिकाणी तातडीनं मदत पोहोचवणं गरजेचं होतं. ती मदत तिथे पोहोचवली गेली, अशी माहिती आदित्य यांनी दिली.

महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारी

प्रत्येक वेळी टीव्हीवर येऊन सांत्वन होत नाही. प्रत्येक प्रसंगात टीव्हीवर येणं गरजेचंदेखील नसतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला. 'दुर्घटनास्थळी आम्ही गेल्यावर तिथे गर्दी होते. पोलीस बंदोबस्तस वाढवला जातो. याचा परिणाम तिथे सुरू असलेल्या मदतकार्यावर होतो. आम्ही तिथे गेल्यावर माध्यमांशी बोलतो. त्यावेळी तिथे मदतकार्यात अडथळे येतात. ज्या ठिकाणी मदतकार्य वेगानं व्हायला हवं, त्याच गोष्टीला व्हीआयपींच्या भेटीमुळे उशीर होतो,' असं आदित्य ठाकरे म्हणाले.

एखाद्या परिसरात दुर्घटना घडल्यास तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात. मदतकार्य वेगानं होईल यासाठी प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांत रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडल्या. त्यावेळी तिथले पालकमंत्री घटनास्थळी पोहोचले होते. मुख्यमंत्री जिल्ह्यातील प्रशासनाशी संपर्क साधून मदतीचा आढावा घेतात. केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात. जनरलनं वॉर रुममध्ये राहून काम करायचं असतं. इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही सध्या याच पद्धतीनं काम करत आहेत, असं आदित्य यांनी सांगितलं.

Read in English

Web Title: CoronaVirus News aditya thackeray explains why cm uddhav thackeray prefer work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.