Coronavirus: मोदी, योगींच्या प्रतिमेला कोरोनामुळे धक्का, उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या सर्वेतील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:45 AM2021-05-25T06:45:24+5:302021-05-25T06:46:08+5:30

Coronavirus: काँग्रेस या सर्वेक्षणानंतर फक्त उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आक्रमक झालेला नाही तर, कोरोना महामारीशी लढत असलेल्या लोकांना त्याने मदतकार्यालाही वेग दिला आहे. 

Coronavirus: Modi, yogi's image hit by corona, findings from Congress survey in Uttar Pradesh | Coronavirus: मोदी, योगींच्या प्रतिमेला कोरोनामुळे धक्का, उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या सर्वेतील निष्कर्ष

Coronavirus: मोदी, योगींच्या प्रतिमेला कोरोनामुळे धक्का, उत्तर प्रदेशमध्ये केलेल्या सर्वेतील निष्कर्ष

Next

- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला कोरोना महामारीमुळे जबर धक्का बसला, असा निष्कर्ष काँग्रेसनेउत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात निघाला. काँग्रेस या सर्वेक्षणानंतर फक्त उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आक्रमक झालेला नाही तर, कोरोना महामारीशी लढत असलेल्या लोकांना त्याने मदतकार्यालाही वेग दिला आहे. 

सूत्रानुसार महासचिव प्रियंका गांधी आणि मदत पोहोचविण्यासाठी बनविल्या गेलेल्या गटाचे अध्यक्ष ग़ुलाम नबी आझाद या मदतकार्यावर देखरेख करीत आहेत. पक्षाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मदत शिबिर सुरू करून रुग्णालयांजवळ गरजू लोकांना भोजन, झोपडपट्टीत कोरडा शिधा, रुग्णवाहिका, औषधे देणे सुरू केले आहे. या कामात एनएसयूआय, युवक काँग्रेस तथा प्रदेश नेत्यांना सक्रिय करण्यात आले आहे. केंद्रीय नेतृत्वात बसलेल्या प्रदेश नेत्यांना जिल्हानिहाय जबाबदारी दिली आहे. त्याची समीक्षा केंद्रीय कंट्रोल रूममधून प्रियंका गांधी आणि ग़ुलाम नबी आझाद करीत आहेत. एक नियंत्रण कक्ष लखनौतही स्थापन झाला असून, त्याची माहिती देताना लल्लू म्हणाले की, पूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू आहे.

Web Title: Coronavirus: Modi, yogi's image hit by corona, findings from Congress survey in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.