CoronaVirus Live Updates : "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?"; मनसेचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 09:27 AM2021-05-11T09:27:05+5:302021-05-11T09:38:58+5:30

MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government Over Corona in Maharashtra : कोरोना परिस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

CoronaVirus Live Updates MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government Over Corona in Maharashtra | CoronaVirus Live Updates : "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?"; मनसेचा संतप्त सवाल

CoronaVirus Live Updates : "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?"; मनसेचा संतप्त सवाल

Next

मुंबई - राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली, तर दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात ३७ हजार ३२६ रुग्ण आणि ५४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याच दरम्यान मनसेने (MNS) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. "रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?" असा संतप्त सवाल मनसेने केला आहे. 

कोरोना परिस्थितीवरुन (Corona Virus) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात???" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. 

काही दिवसांपूर्वीच राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्याही पुढे गेले हाेती. दिवसभरात ६१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७ टक्के असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ रुग्ण उपचाऱाधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९६ लाख ३१हजार १२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या मुंबईत ४५ हजार ५३४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दिलासा; मुंबईसह राज्यात रुग्णसंख्येत घट, राज्यात दिवसभरात ३७ हजार कोरोनाबाधित

मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ६ लाख ७८ हजार २६९ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ८९१ जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख १६ हजार ९९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्या ६२ रुग्णांपैकी ५१ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. तसेच यामध्ये ४६ रुग्ण पुरुष आणि २८ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होते, तर ४४ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २७ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते. मुंबईत दिवसभरात २३ हजार ०६१ कोरोनाच्या चाचण्या झाल्या असल्याने आत्तापर्यंत चाचण्यांची संख्या ५७ लाख ३३ हजार ४३१ वर पोहोचली आहे. ३ मे ते ९ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.४१ टक्के इतका असून दुप्पटीचा दर १६३ दिवसांवर आहे. मुंबईतील सक्रिय कंटेन्मेंट झोन ८७ आहेत, तर सक्रिय सीलबंदी इमारती ४९३ इतक्या आहेत. राज्यात एकूण ५१ लाख ३८ हजार ९७३ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ७६ हजार ३९८ आहे. शनिवारी आणि रविवारी कोरोना चाचण्या कमी झाल्याने वाढीचे नेमके प्रमाण किती आहे, हे येत्या एक -दोन दिवसात स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: CoronaVirus Live Updates MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government Over Corona in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.