“मोदी कृपेने आता स्वतःच्या बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 01:57 PM2021-08-01T13:57:39+5:302021-08-01T13:58:56+5:30

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने राज्यभर इंधनदरवाढ, महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलने केल्याचे पाहायला मिळाले.

congress sachin sawant criticised pm modi govt over increased atm fee charge | “मोदी कृपेने आता स्वतःच्या बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!”

“मोदी कृपेने आता स्वतःच्या बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!”

googlenewsNext

मुंबई: केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून अनेकविध मुद्द्यांवरून टीका करण्यात येत आहे. कोरोना परिस्थिती, लसीकरण, महागाई, इंधनदरवाढ, गॅसची वाढती किंमत, पेगॅसस हेरगिरी प्रकरण अशा विविध विषयांवरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. यातच बँकांकडून एटीएमवर शुल्क आकारू शकणार्‍या इंटरचेंज फीमध्ये १ ऑगस्टपासून यामध्ये २ रुपये वाढ लागू करण्यात आली आहे. यावरून, मोदी कृपेने आता स्वतःच्या बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवले, असा खोचक टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. (congress sachin sawant criticised pm modi govt over increased atm fee charge)

महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने राज्यभर इंधनदरवाढ, महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारविरोधात आंदोलने केल्याचे पाहायला मिळाले. यात आता एटीएम शुल्क आकारणीत वाढीची भर पडली असून, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एक ट्विट करत सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 

“अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही”

स्वतःचे पैसे महाग झाले

आजपासून एटीएम सुविधा व डेबिट कार्डच्या वापरासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. अच्छे दिनमध्ये स्वतःचे पैसे महाग झाले. इलेक्ट्रॉनिक पेमेंटचा मोदीजी आग्रह धरतच होते. भविष्यात मोदीकृपेने स्वतःच्या पैशाकडे किंवा बँकेकडे नजर टाकण्यासाठी पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं, असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे. या ट्विटसह सचिन सावंत यांनी मोदी हैं तो मुमकिन है, असा हॅशटॅगही वापरला आहे. 

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने जून महिन्यात इंटरचेंज फी १५ ते १७ रुपयांनी वाढविली तर बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी फी ५ रुपयांवरून ६ पर्यंत वाढविण्यात वाढ केली. बँकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंटसाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी ग्राहकांकडून घेतली जाते. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहक त्यांच्या खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार करण्यास पात्र असतील.

Web Title: congress sachin sawant criticised pm modi govt over increased atm fee charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.