आनंद कसला साजरा करताय?; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 11:21 AM2021-03-04T11:21:39+5:302021-03-04T11:43:03+5:30

congress leader sanjay nirupam slams congress and ncp mlas: बाबरी मशीदबद्दलच्या विधानावरून काँग्रेस नेत्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना सुनावले खडे बोल

congress leader sanjay nirupam slams congress and ncp mlas over cm uddhav thackeray speech | आनंद कसला साजरा करताय?; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं

आनंद कसला साजरा करताय?; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं

googlenewsNext

मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल विधानसभेत भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर, औरंगाबादचं नामांतर, राम मंदिर यांच्यासारख्या अनेक विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केलं. बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला गेल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला देत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावरून आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना खडे बोल सुनावले आहेत.

उद्धव ठाकरेंनी लोकसभेत जावं, खासदार व्हावं अन् त्यांचं मुख्यमंत्रीपद जावं- सुधीर मुनगंटीवार

'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी मशिदीच्या विध्वंसाबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले काँग्रेस आणि एनसीपीचे मंत्री आणि आमदार त्यांच्या भाषणाचा आनंद घेत होते. हा हा कोणता किमान समान कार्यक्रम? ओवैसींच्या विषारी रोपट्याच्या वाढीला यातूनच खतपाणी मिळत नाही की का?,' असे प्रश्न निरुपम यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत. 



विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री?
'विरोधक बाळासाहेबांची वेळोवेळी आठवण काढतात. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. निदान त्यांना तरी विसरला नाहीत. त्यांना विसरणार नसाल, तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी पाडली तेव्हा येरेगबाळे पळून गेले होते. पण बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. आता विषय असा आहे की बाबरी कोणी पाडली ते आम्हाला माहीत नाही. पण शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. केवळ अभिमान नाही, तर गर्व आहे. सहा वर्षात केंद्रात सत्ता असताना राम मंदिरासाठी कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता घरोघरी जाऊन मंदिरासाठी पैसे मागत आहेत. म्हणजे पैसे जनता देणार. पण नाव यांचं येणार,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला आणि मोदी सरकारला लक्ष्य केलं.

Web Title: congress leader sanjay nirupam slams congress and ncp mlas over cm uddhav thackeray speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.