बाबरी पाडली तेव्हा 'येरेगबाळे' पळून गेले, बाळासाहेब एकटे उभे होते; उद्धव ठाकरेंचा सडेतोड पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:59 PM2021-03-03T16:59:35+5:302021-03-03T17:02:39+5:30

CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे

cm uddhav thackeray in vidhan sabha live criticism on bjp devendra fadnavis over hindutva | बाबरी पाडली तेव्हा 'येरेगबाळे' पळून गेले, बाळासाहेब एकटे उभे होते; उद्धव ठाकरेंचा सडेतोड पलटवार

बाबरी पाडली तेव्हा 'येरेगबाळे' पळून गेले, बाळासाहेब एकटे उभे होते; उद्धव ठाकरेंचा सडेतोड पलटवार

googlenewsNext

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी "तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम!!" या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद प्रकरणाची भाजपला आठवण करुन दिली. 

भाजप आमदाराकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख; देवेंद्र फडणवीसांकडून लगेच दिलगिरी

"भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे काही  शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व 'येर गबाळे' पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये. जम्मू-काश्मीरमध्ये युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. 

व्हिलन, खलनायक ठरवलं तरी चालेल, राज्यातील जनतेची काळजी घेणार - उद्धव ठाकरे 

बंद दाराआडच्या वचनावरुन मुख्यमंत्री आक्रमक
विधानसभा निवडणुकीआधी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. "ज्या बाळासाहेबांची आठवण तुम्हाला आता होतेय. ज्या हिंदुत्वावर तुम्ही बोलत आहात. मग ज्या खोलीला आम्ही हिंदुत्वाचं मंदिर मानतो. त्या खोलीत अमित शहांनी दिलेलं वचन बाहेर आल्यावर तुम्ही निर्लज्जपणे नाकारता. याची लाज वाटायला हवी", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी सांगितली 'नारायण भंडारी'ची गोष्ट
विरोधकांकडे पाहत आज मी तुम्हाला नारायण भंडारीची गोष्ट सांगणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 'तुम्ही मला एका नारायण भंडारीची गोष्ट सांगितली. तोच नारायण भंडारी पुढे मोठा होतो. गाव सोडून जातो. मोठा माणूस होतो आणि एकदा स्वत:च्या गाडीनं गावाला येतो. तो गुरुजींच्या भेटीला जातो. मला ओळखलं का असं विचारतो. गुरुजी त्याचं कौतुक करतात. टीव्हीवर तुला रोज पाहतो म्हणतात. गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत बोलणाऱ्या नारायणचं कौतुक करतात,' अशी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.
 

Web Title: cm uddhav thackeray in vidhan sabha live criticism on bjp devendra fadnavis over hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.