भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा पलटवार

By मोरेश्वर येरम | Published: December 3, 2020 05:23 PM2020-12-03T17:23:25+5:302020-12-03T17:23:51+5:30

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून निवडणुकीला उभं राहिलेल्या अमरिश पटेल यांचा धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय झाला आहे.

BJP won by stealing from anothers house says Ashok Chavan | भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा पलटवार

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा पलटवार

googlenewsNext

मुंबई
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर भाजपकडून जोरदार टीका केली गेली. भाजपच्या टीकेला काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे", असा घणाघात चव्हाण यांनी केला आहे. 

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपकडून निवडणुकीला उभं राहिलेल्या अमरिश पटेल यांचा धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. अमरिश पटेल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने महाविकास आघाडीला मोठं नुकसान झालं आहे. त्यावरही अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"भाजपने मिळवलेला विजय हा दुसऱ्याच्या घरात चोरी करुन मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरात चोरी करायी आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं अशातला हा प्रकार आहे. आम्हाला पाच जागा मिळतील आणि आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्ष टिकेल", असं अशोक चव्हाण म्हणाले. 

धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीकडे २१३ सदस्यांची ताकद होती. तर भाजपकडे १९९ सदस्य होते. असं असतानाही अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीची मतं फोडण्यात यश मिळवलं. महाविकास आघाडीचे उमेदवार यांना केवळ ९८ मतं मिळाली. तर भाजपच्या अमरिश पटेल यांना तब्बल ३३२ मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. 

Web Title: BJP won by stealing from anothers house says Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.