“छत्रपती शिवरायांना मानणारा मावळा, या क्षणाला मी आणि माझ्या कुटुंबाची नार्को टेस्ट करावी”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 10:56 AM2020-09-04T10:56:54+5:302020-09-04T10:58:25+5:30

आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची  प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिली हेच सरकारच्या जिव्हारी लागलं असंही आमदार राम कदम यांनी आरोप केला आहे.

BJP Ram Kadam Target State government over Sushant Singh Rajput case & Kangana Ranaut Statement | “छत्रपती शिवरायांना मानणारा मावळा, या क्षणाला मी आणि माझ्या कुटुंबाची नार्को टेस्ट करावी”

“छत्रपती शिवरायांना मानणारा मावळा, या क्षणाला मी आणि माझ्या कुटुंबाची नार्को टेस्ट करावी”

Next
ठळक मुद्देड्रग माफिया यांना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्नसरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का?काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या ट्विटला राम कदम यांचे रोखठोक उत्तर

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग प्रकरणावरुन सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आमदार राम कदम यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली होती. त्यावर आमदार राम कदम यांनीही सचिन सावंत यांना प्रतिआव्हान दिले आहे.

याबाबत आमदार राम कदम यांनी ट्विटला उत्तर दिले आहे की, छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे उद्या नव्हे ,या क्षणाला सांगाल त्या ठिकाणी मी यायला तयार आहे मी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करावी. तयार आहे पण मात्र या प्रकरणात अडकलेले तुमच्या सरकारचे बडे नेते, मंत्री नार्को टेस्ट करायाला तयार आहेत का ? ते तपासून पहा असा टोला त्यांनी लगावला आहे.

तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बडे नेते अभिनेते आणि ड्रग माफिया यांना महाराष्ट्र सरकारचा वाचवण्याचा प्रयत्न संपूर्ण देश दुनियाने पाहिला. या कालखंडात आक्रमकपणे सुशांतला न्याय मिळावा म्हणून आम्हा सर्वांची  प्रामाणिक धडपड संपूर्ण देशाने पाहिली हेच सरकारच्या जिव्हारी लागलं असंही आमदार राम कदम यांनी आरोप केला आहे.

काय म्हणाले होते सचिन सावंत?

विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात ५३ वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता व भाजपाचे ड्रग माफिया संबंध ही उघड होतील. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजपा करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे. कंगना टीम म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजपा आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व आमची मुंबईवर प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला होता.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर आमदार राम कदम यांनी कंगना अशा धमक्यांना घाबरणार नाही, ती झाशीची राणी आहे असं सांगत तिची पाठराखण केली होती. तर अनेकांनी कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं संताप व्यक्त केला आहे.  

Web Title: BJP Ram Kadam Target State government over Sushant Singh Rajput case & Kangana Ranaut Statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.