Virar Hospital Fire : "'सुसाईड डेस्टिनेशन'ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 12:53 PM2021-04-23T12:53:09+5:302021-04-23T13:07:28+5:30

BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Virar Hospital Fire : प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Virar Hospital Fire | Virar Hospital Fire : "'सुसाईड डेस्टिनेशन'ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!"

Virar Hospital Fire : "'सुसाईड डेस्टिनेशन'ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!"

googlenewsNext

मुंबई - नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाच आता विरारमधील एका रुग्णालयातील कोविड सेंटरला भीषण (Virar Hospital Fire) आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (BJP Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. ""सुसाईड डेस्टिनेशन"ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!" असं म्हणत टीका केली आहे. 

"राज्य सरकार आता तरी जागे व्हा!! नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार 'जबाबदार' आहे" असं म्हटलं आहे. प्रविण दरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. "कोरोनापेक्षा "सरकारी मुर्दाडपणामुळे" अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "महाराष्ट्रातील रुग्णालय आग प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. भंडारा, भांडूप, नागपूर आणि आता विरार कोविड रुग्णालयांना आगी लागल्या, नाशिकला ऑक्सिजन गळती झाली. "कोरोनापेक्षा "सरकारी मुर्दाडपणामुळे" अनेक निष्पापांना जीव गमवावा लागला" असं म्हटलं आहे. 

"सुसाईड डेस्टिनेशन"ची फुशारकी मारणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय! मृतांना श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत" असं देखील दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये ही आग लागली. येथील कोविड सेंटरमध्ये एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. 

"महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे", भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी (BJP Kirit Somaiya) यावरून हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी" असं म्हटलं आहे. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत. "महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे" असं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

 

Web Title: BJP Pravin Darekar Slams Thackeray Government Over Virar Hospital Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.