CoronaVirus Live Updates : "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?"; भाजपाचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 03:52 PM2021-05-08T15:52:47+5:302021-05-08T16:09:33+5:30

BJP Prasad Lad Slams CM Uddhav Thackeray Over Konkan Corona Patient : भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?" असा संतप्त सवाल केला आहे. 

BJP Prasad Lad Slams CM Uddhav Thackeray And Thackeray Government Over konkan corona patient | CoronaVirus Live Updates : "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?"; भाजपाचा संतप्त सवाल

CoronaVirus Live Updates : "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?"; भाजपाचा संतप्त सवाल

Next

मुंबई - देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली असून दोन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे राज्यात देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?" असा संतप्त सवाल केला आहे. 

भाजपा नेते प्रसाद लाड (BJP Prasad Lad) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) टीकास्त्र सोडलं आहे. "कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी अशी विनंती देखील केली आहे. प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 

"कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 15,166 रुग्ण बाधित झाले. त्यातील 11,000 रुग्ण बरे झाले आहेत. आज सिंधुदुर्गमध्ये 3675 सक्रिय रुग्ण असून केवळ 1015 इतक्याच बेड्सची व्यवस्था आहे. आरटीपीसीआर चाचणी बाबतही हीच परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. मात्र तरीही जिल्ह्यांत ही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे" असं लाड यांनी म्हटलं आहे. 

"रत्नागिरीत सध्या 27 हजार 677 रुग्ण असून 19, 448 रुग्ण बरे झाले आहेत. गावागावातील लोक तसेच काही सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत. मात्र यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत" असा गंभीर आरोप देखील प्रसाद लाड यांनी केला आहे, सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी. सर्व आमदार, खासदारांसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे का असेन पण एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी अशी विनंती प्रसाद लाड यांनी केली आहे.

"महाराष्ट्राची मान अपमानाने, शरमेने झुकतेय; तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, कुठे गेली तुमची अस्मिता?"

पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. याच दरम्यान भाजपाने (BJP) यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी "महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे; तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, कुठे गेली तुमची अस्मिता?" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच "धोरणलकवा आणि निर्णयलकव्यात गुरफटलेले सरकार पोलिसांना संरक्षण देणार की त्यांच्यावर होणारे हल्ले षंढपणाने पाहणार? असा सवाल देखील भाजपाने विचारला आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. 

"राज्यकर्त्यांनो, पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे. दिवसागणिक पोलिसांवर हल्ले होत आहेत, भर दिवसा पोलिसांचे मुडदे पाडले जात आहेत, महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे, आणि तुम्ही मात्र मूग गिळून गप्प बसला आहात. कुठे गेली तुमची अस्मिता? संगमनेरमध्ये गर्दी करू नका सांगणाऱ्या पोलिसावर जमावाने काल हल्ला केला. पण अजूनही पोलिसांचा अपमान झाल्याचा साक्षात्कार संजय राऊत यांना कसा झाला नाही? हल्लेखोर कोण पाहून टोपी फिरवली की काय?" असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

Web Title: BJP Prasad Lad Slams CM Uddhav Thackeray And Thackeray Government Over konkan corona patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.