"संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का..?"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:59 PM2021-06-11T12:59:24+5:302021-06-11T13:01:55+5:30

भाजपचे प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

bjp leader chandrakant patil questions mp sambhajiraje chhatrapati stand on maratha reservation | "संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का..?"

"संभाजीराजे, राज्य सरकारला वाचवण्यासाठी आपण मदत करणार आहात का..?"

Next

कोल्हापूर: मोर्चा काढायचा रद्ध करून राज्य सरकारला वाचण्यासाठी आपण मदत करणार आहात का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांना केला आहे. संभाजीराजे यांचे नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. आधी मोर्चा काढतो म्हणाले. नंतर आमदार-खासदार यांना जाब विचारणार म्हटले. पुन्हा पुण्यातून मुंबईला लॉंग मार्च काढणार म्हणाले. तुम्ही नेमकं काय करणार आहात हे नीट समाजासमोर मांडलं पाहिजे, असं पाटील म्हणाले.

आम्ही मोर्चा काढणार नाही. पण दुसरे कुणी मोर्चा काढत असतील, तर त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ असे आमदार पाटील यांनी म्हटले. खासदार संभाजीराजे यांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. आंदोलनात चालढकल केली तर ते समजण्याइतका मराठा समाज सुज्ञ आहे असाही गर्भित इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला.

Read in English

Web Title: bjp leader chandrakant patil questions mp sambhajiraje chhatrapati stand on maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.