"...तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही", चंद्रकांत पाटलांचे सत्ताधारी पक्षांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:44 PM2021-05-03T12:44:38+5:302021-05-03T12:46:15+5:30

BJP Leader Chandrakant Patil : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.

BJP Leader Chandrakant Patil Criticizes Maha Vikas Aaghadi on Pandharpur bypoll result | "...तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही", चंद्रकांत पाटलांचे सत्ताधारी पक्षांना आव्हान

"...तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही", चंद्रकांत पाटलांचे सत्ताधारी पक्षांना आव्हान

Next
ठळक मुद्देसत्ताधारी महाविकास आघाडीडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये किमान २०० जागा जिंकून सरकार स्थापण्याचे भाजपाचे प्रयत्न हाणून पाडताना मतदारांनी बंगालची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या हाती तर दिलीच, पण तृणमूल काँग्रेसच्या २१५ उमेदवारांना विजयी करताना भाजपाला १०० जागाही मिळू दिल्या नाहीत.पश्चिम बंगालच्या या निकालाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या निकालवरून राज्यातील महाविकास आघाडी भाजपाला लक्ष्य करताना दिसत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (BJP Leader Chandrakant Patil Criticizes Maha Vikas Aaghadi on Pandharpur bypoll result)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकलाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. "महाराष्ट्रात माझे आव्हान आहे, कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळं लढून पाहावं, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून, सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले, तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही," असे ट्विटद्वारे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला यश
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव करून  विजयी झाले.  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र  भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवाची 'ही' आहेत कारणे 
राष्ट्रवादीत निवडणुकीअगोदर पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची मागील काही वर्षांपासून असलेली बिकट आर्थिक अवस्था, भगीरथ भालके यांचा कमी असलेला जनसंपर्क, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे कट करण्यात आलेले वीज कनेक्शन, कर्जमाफी, अनुदान, विठ्ठल बळकावण्याचा भाजपकडून केलेला प्रचार यानंतर अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदारांनी प्रचार करूनही ही जागा महाविकास आघाडीला राखण्यात अपयश आले.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल
गेल्या महिन्यात देशातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यातून तामिळनाडू व पुदुच्चेरी वगळता कुठेही सत्ताबदल झालेला नाही. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या पराभव  द्रमुक व काँग्रेस आघाडीने केला आहे. तिथे भाजपाने अण्णा द्रमुकशी युती केली होती. द्रमुक व मित्रपक्षांना १४८ तर अण्णा द्रमुक व भाजपा यांना मिळून ८३ जागांवर विजय मिळाला आहे. तर पुदुच्चेरीमध्ये मात्र एआयएनआरसी या मित्र पक्षाच्या साह्याने भाजपाला सरकारमध्ये जाता येईल. तेथील एकूण ३० पैकी १३ जागा भाजपा व मित्रपक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे तिथे अपक्षांची मदत घ्यावी लागेल. 

(Mamata Banerjee: सरकार स्थापन करणार की राजीनामा देणार? ममता बॅनर्जी राज्यपालांच्या भेटीला जाणार)

गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या आसाममध्ये मात्र भाजपाच पुन्हा सरकार स्थापन करेल. तेथील १२७ पैकी ७६ जागा भाजपा व मित्र पक्षांनी जिंकल्या आहेत. तिथे आपण सत्तेत येऊ, असे काँग्रेसला वाटत होते. त्यासाठी स्थानिक पक्षांनाही सोबत घेतले होते. पण मतदारांनी काँग्रेस व मित्रपक्षांचे ४८ उमेदवारच विधानसभेत पाठविले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये किमान २०० जागा जिंकून सरकार  स्थापण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडताना मतदारांनी  बंगालची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या हाती तर दिलीच, पण तृणमूल काँग्रेसच्या २१५ उमेदवारांना विजयी करताना भाजपला १०० जागाही मिळू दिल्या नाहीत.

Web Title: BJP Leader Chandrakant Patil Criticizes Maha Vikas Aaghadi on Pandharpur bypoll result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.