Bihar Exit Poll: बिहारचा महा-एक्झिट पोल! नितिशकुमार यांचा 'चिराग' विझणार? तेजस्वी यादव सत्तेत येण्याचे संकेत

By हेमंत बावकर | Published: November 7, 2020 08:08 PM2020-11-07T20:08:43+5:302020-11-07T20:09:35+5:30

Bihar Assembly Election Exit Poll: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. अन्य एजन्सींचेदेखील एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात 54.57 टक्के मतदान झाले असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. 

Bihar Exit Poll: Nitish Kumar's JDU-BJP lost, Tejasvi yadav's RJD-Congress will Win Election | Bihar Exit Poll: बिहारचा महा-एक्झिट पोल! नितिशकुमार यांचा 'चिराग' विझणार? तेजस्वी यादव सत्तेत येण्याचे संकेत

Bihar Exit Poll: बिहारचा महा-एक्झिट पोल! नितिशकुमार यांचा 'चिराग' विझणार? तेजस्वी यादव सत्तेत येण्याचे संकेत

googlenewsNext

पटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडला. यामध्ये भाजपा-जदयू महायुती, काँग्रेस-राजद आघाडी आणि तिसरा पासवान यांचा पक्ष अशी तिरंगी लढत झाली. मात्र, चिराग पासवान यांनी तिन्ही टप्प्यांमध्ये महायुतीत न राहूनही मी भाजपासोबत, असाच नारा देत महायुतीची मते फोडण्याचे लक्ष्य ठेवले होते. यानुसार सर्व्हेमध्ये पासवान गटाने 25 जागांवर जदयूला फटका दिल्याचे सांगितले जात आहे. तर अन्य एजन्सींचेदेखील एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात 54.57 टक्के मतदान झाले असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. 


रिपब्लिक भारत 
रिपब्लिक भारत आणि जन की बातने केलेल्या एक्झिट पोलनुसार पासवान यांनी जदयूला 25 जागांवर नुकसान पोहोचविले आहे. एनडीएला 37-39 टक्के मतदान, महाआघाडीला 40-43 टक्के, एलजेपीला 7-9 टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर एनडीएला 91-117 जागा, महाआघाडीला 118- 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलजेपीला 5-8 जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. 


एबीपी न्यूज- सीवोटर सर्व्हे
एबीपी न्यूज आणि सीव्होटर सर्व्हेमध्ये एनडीएला 104 ते 128 जागा, तेजस्वी यादवा यांच्या महाआघाडीला 108 ते 131 जागा, पासवान यांच्या एलजेपीला 1-3  आणि इतरांना 4-8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


टाइम्स नाउ-C Voter 
बिहार विधनसभा निवडणुकीत टाइम्स नाउ- C Voter यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये नितिश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळणार आहे. सर्व्हेमध्ये एनडीएला 116 जागा आणि महाआघाडीला 120 जागा देण्यात आल्या आहेत. एलजेपीला 1 जागा आणि अन्य 6 जागा. 


Today's Chanakya
टुडेज चानक्य यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये 63 टक्के लोकांना यंदा सत्ताबदल हवा आहे. 35 टक्के लोकांनी बेरोजगारी महत्वाचा मुद्दा म्हटले आहे. 19 टक्के लोकांना भ्रष्टाचार महत्वाचा मुद्दा वाटला, तर 34 टक्के लोकांना अन्य मुद्दे महत्वाचे वाटले आहेत. 
 

Web Title: Bihar Exit Poll: Nitish Kumar's JDU-BJP lost, Tejasvi yadav's RJD-Congress will Win Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.