Bihar Election 2020 : "15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?"; राबडी देवींचा मोदींना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 08:31 AM2020-10-15T08:31:20+5:302020-10-15T08:53:02+5:30

Bihar Election 2020 : लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांनी ट्विटरवर सुशील मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे.

Bihar Election 2020 rabri devi slams sushil modi over unemployment | Bihar Election 2020 : "15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?"; राबडी देवींचा मोदींना सणसणीत टोला

Bihar Election 2020 : "15 वर्षे काय मटार सोलत होतात काय?"; राबडी देवींचा मोदींना सणसणीत टोला

Next

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार (Bihar Election 2020) वेगाने सुरू असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे सोशल मीडियावर देखील निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. एनडीए आणि महाआघाडीचे नेते सतत एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. विविध मुद्द्यांवरून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. लालूप्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबावर सतत टीका करणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी (Sushil Modi) यावेळी स्वत: ट्विटर करून फसले आहेत. े

लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) यांनी ट्विटरवर सुशील मोदी यांना सणसणीत टोला लगावला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काराकाटच्या एका निवडणूक प्रचार सभेत जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही असं म्हटलं आहे. सुशील मोदी यांच्या या वक्तव्यावर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. त्यांपैकी एक बातमी सुशील मोदी यांनी ट्विटरवर शेअर केली. मोदी यांचे ट्विट रिट्विट करत राबडी देवी यांनी निशाणा साधला आहे. 

"लो कर लो बात. 15 वर्षांपासून काय मटार सोलत होतात काय?, बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना 15 वर्षांनंतर समजलं आहे. तेजस्वी तुम्हा लोकांना आता मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल" असं ट्विट राबडी देवी यांनी केलं आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल 2015 च्या निवडणुकीत 81 जागा मिळाल्या आणि हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र त्या निवडणुकीत हा पक्ष जनता दल संयुक्तसोबत निवडणूक लढला होता. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढत आहेत. 

'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी

गेल्या काही दिवसांपासून लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबड़ी देवी आणि तेजस्वी यादव यांनीही सत्ताधारी नितीशकुमार सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. राबडी देवी यांनी याआधीही एक ट्विट करून उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींवर निशाणा साधला होता. कोरोनाला घाबरून कुठे लपून बसलाय सुशील मोदीजी, लवकर बाहेर पडा, असं राबडी देवी यांनी म्हटलं होतं. "सुशील मोदींनी घराबाहेर पडले पाहिजे, त्यांना कोरोना होणार नाही. कारण, सुशील मोदींजवळ 'लालू कवच' आहे. ते दिवसातून  72,000 हजारवेळा 'शक्तिशाली लालू मंत्राचे' पठण करतात आणि कोरोनापासून लांब राहतात", असं ट्विट राबडी देवी यांनी केलं होतं.

"आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील"

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नित्यानंद राय यांनी बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) विजय झाल्यास दहशतवादी काश्मीरमधून बिहारमध्ये आश्रय घेतील अशी भीती व्यक्त केली आहे. नित्यानंद राय यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. वैशाली जिल्हातील महनारमध्ये एका प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी लोकांना संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. "बिहारमध्ये आरजेडी सत्तेत आल्यास दहशतवादी काश्मीरमधून पलायन करुन बिहारमध्ये आश्रय घेतील" असं नित्यानंद राय यांनी म्हटलं आहे. राय यांच्या वादग्रस्त विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"मला सतत देशद्रोही बोलाल तर मी भाजपात प्रवेश करेन"

कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलेला पाहायला मिळत आहे. तसेच "मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन", असं कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे. कन्हैया कुमार हे सोमवारी बगूसराय जिल्हयातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते. नामांकनानंतर कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भाजपावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपाचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत असं देखील कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Bihar Election 2020 rabri devi slams sushil modi over unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.