Bihar Election 2020: ही माझी अखेरची निवडणूक; प्रचारसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

By कुणाल गवाणकर | Published: November 5, 2020 04:58 PM2020-11-05T16:58:20+5:302020-11-05T17:00:15+5:30

Bihar Election 2020: बिहारमध्ये ७ तारखेला तिसऱ्या टप्प्यातलं मतदान; पूर्णियात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Bihar Election 2020 This is my last election says Bihar CM Nitish Kumar | Bihar Election 2020: ही माझी अखेरची निवडणूक; प्रचारसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

Bihar Election 2020: ही माझी अखेरची निवडणूक; प्रचारसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांची घोषणा

Next

पाटणा: बिहारमधील निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली आहे. ७ नोव्हेंबरला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान असून १० नोव्हेंबरला निकाल आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मित्रपक्ष भाजपनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभांचं आयोजन करून बिहार पिंजून काढला आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. पूर्णियामध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं कुमार म्हणाले. 'आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे,' असं कुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं. आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थितांना विचारला. 




नितीश कुमार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे. भाजपसोबत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या संयुक्त जनता दलासमोर राजद आणि काँग्रेसनं तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यातच केंद्रात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षानं बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकजनशक्ती पक्ष अगदी उघडपणे कुमार यांच्याविरोधात उतरला आहे. त्यांनी संयुक्त जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात सगळ्याच जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र भाजपच्या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे जनता दलाच्या अडचणी वाढल्या आहेत.

एका बाजूला चिराग पासवान सातत्यानं नितीश कुमार यांना लक्ष्य करत आहेत. आज पंतप्रधान मोदींसमोर नतमस्तक होणारे नितीश निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादवांसमोर नतमस्तक होतील. ते खुर्ची टिकवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलासोबत जातील, अशा शब्दांत पासवान मुख्यमंत्र्यांना लक्ष करत आहेत. तर नितीश कुमार यांचं वय वाढलं आहे. त्यामुळे त्यांना रिटायर करा, असं आवाहन तेजस्वी यादव बिहारी जनतेला करत आहेत.

Web Title: Bihar Election 2020 This is my last election says Bihar CM Nitish Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.