पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी; भाजपाने काढले नियुक्ती आदेश

By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 10:20 PM2020-11-13T22:20:59+5:302020-11-13T22:37:28+5:30

Pankaja Munde news: भाजपाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले होते.

Big responsibility to Pankaja Munde, Vinod Tawde; state in charge of BJP | पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी; भाजपाने काढले नियुक्ती आदेश

पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी; भाजपाने काढले नियुक्ती आदेश

Next

मुंबई : भाजपाने दिवाळीच्या दिवशी 'नाराज' असलेल्या पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठे गिफ्ट दिले आहे. आज सायंकाळी उशिरा भाजपाने राज्यांचे प्रभारी आणि सह प्रभारी नियुक्त केले असून यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नावे आहेत. 


भाजपाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले होते. आज जाहीर केलेल्या यादीमध्ये पंकजा यांची मध्य प्रदेश सह प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांची हरियाणा प्रदेश भाजप प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 



 


सुनील देवधर यांची आंध्रप्रदेश सह प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विजया रहाटकर यांची दमन दीव - दादरा - नगर हवेली प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

कैलाश विजयवर्गीय यांना पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे प्रभारी बनविण्य़ात आले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठे यश मिळवून दिले होते. बंगालमध्ये भाजपाला पहिल्यांदाच 18 जागा जिंकता आल्या होत्या. पुढील वर्षी तेथे विधानसभा निवडणूकही होणार आहे.


भूपेंद्र यादव यांना पुन्हा बिहार आणि गुजरातचा प्रभारी बनविण्यात आले आहे. भाजपाचे माजी महासचिव राम माधव यांना कोणत्याही राज्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. तसेच महासचिव अनिल जैन आणि सरोज पांडे यांनादेखील कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. 


टीव्हीवर पक्षाची बाजू मांडणारे प्रवक्ते संबित पात्रा यांना मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महासचिव मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. राधामोहन सिंह उत्तर प्रदेश, नलीन कोहली नागालँड, अरुण सिंह पंजाब, विनोद सोनकर यांना त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Web Title: Big responsibility to Pankaja Munde, Vinod Tawde; state in charge of BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.