Mamata Banerjee: नंदीग्राम देवून 200 पार जाण्याचा 'फॉर्म्युला' होता खेला होबे? भाजपा अडकली अन् ममतांनी बाजी मारली 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:02 AM2021-05-03T08:02:35+5:302021-05-03T08:07:39+5:30

West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: ममतांनी दाखल केलेला अर्ज, ममतांचे नंदीग्राम आंदोलनाशी कनेक्शन, बिरुलिया बाजारातील घटना यामुळे ही बंगालमधीलच नाही तर पाच राज्यांतील हॉटसीट मानले जाऊ लागले. सुवेंदू येथून आमदार असल्याने भाजपालाही आपोआपच या राजकारणाशी जोडून घ्यावे लागले.

Assembly Election Result 2021: Khela hobe was the 'formula' to cross 200 by paying Nandigram? BJP got stuck and Mamata won | Mamata Banerjee: नंदीग्राम देवून 200 पार जाण्याचा 'फॉर्म्युला' होता खेला होबे? भाजपा अडकली अन् ममतांनी बाजी मारली 

Mamata Banerjee: नंदीग्राम देवून 200 पार जाण्याचा 'फॉर्म्युला' होता खेला होबे? भाजपा अडकली अन् ममतांनी बाजी मारली 

Next

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata banrejee) यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. परंतू, ममता यांनी धूर्तपणे निवडणुकीच्या प्रचारात 'खेला होबे' ची योजना रोवली. खेला होबे म्हणजे काय? बंगालमध्ये या शब्दांचा अर्थ म्हणजे जोरदार टक्कर. ममता यांचे एकेकाळचे सहकारी भाजपात दाखल झाले होते. नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांच्याविरोधात लढण्याचा ममता यांनी निर्णय घेतला. २१ मार्चला सुवेंदू यांनी तमलुकट्आ एका हॉटेलमध्ये बंद दाराआड मिटिंग घेतली होती. याचवेळी ममता या नंदीग्रामची तयारी करत होत्या. (why Mamata Banerjee decided to fight election from Nandigram in West Bengal assembly Election 2021.)

West Bengal Results 2021:पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा नाही, डाव्यांचा खेळ खल्लास; भाजपाला मतदारांनी दिला 'चकवा'


नंदीग्राममधून ममता उभ्या राहिल्याने राज्यातील आणि केंद्रातील भाजपची  सारी ताकद नंदीग्राममध्येच व्यस्त राहिली. ममतांनी दाखल केलेला अर्ज, ममतांचे नंदीग्राम आंदोलनाशी कनेक्शन, बिरुलिया बाजारातील घटना यामुळे ही बंगालमधीलच नाही तर पाच राज्यांतील हॉटसीट मानले जाऊ लागले. सुवेंदू येथून आमदार असल्याने भाजपालाही आपोआपच या राजकारणाशी जोडून घ्यावे लागले. मीडियानेदेखील याच सीटला महत्व दिले, यामुळे ही जागा म्हणजे रणांगण झाली. भाजपाला प्रतिष्ठेची झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून अन्य मंत्र्यांची सारखीच रेलचेल सुरु झाली. सुवेंदू अधिकारीदेखील मतदारसंघातच राहू लागले. या साऱ्याचा फायदा ममतांनी घेतला. 


भाजपाचे नेते नंदीग्राममध्ये गुंतून पडल्याने टीएमसीने अन्य मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली. ममतांनी नंदग्रामला एवढी महत्वाची जागा बनविले की, अन्य मतदारसंघांकडे भाजपाचे लक्षच गेले नाही. यामुळे टीएमसीने स्थानिक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्या त्या मतदारसंघांमध्ये मॅनेज केले. स्थानिक राज्य असल्याने तृणमूलकडे कार्यकर्ते होते. प्रत्येक मतदारसंघात प्रशांत किशोर यांची एक टीम, आमदाराची एक टीम आणि पक्षाचे कार्यकर्ते असे कामाला लागले होते, असे राजकीय धुरीणांनी सांगितले. 


याच काळातील भाजपाच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये टीएमसीसाठी फायद्याची ठरत गेली. कुठे ना कुठे असा मेसेज गेला की, मुस्लिम समाज ममता यांच्यासोबतच सुरक्षित आहे. भाजपाची सरकार बनली तर समस्या होऊ शकते. यामुळे ही व्होटबँक एकत्रितपणे तृणमूलला मिळाली. तसेच भाजपाला रोखण्यासाठी ममतांच्या साथीला अन्य छोटे-मोठे विरोधी पक्ष आले. कोरोनामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णयही एकप्रकारे तृणमूलला पाठिंबा दिल्याचे संकेत ठरला, असे राजकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. 

Web Title: Assembly Election Result 2021: Khela hobe was the 'formula' to cross 200 by paying Nandigram? BJP got stuck and Mamata won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.