सोनोवाल, जे. पी. नड्डांसह ८ जणांविरुद्ध तक्रार, जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याचा काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:01 AM2021-03-30T05:01:21+5:302021-03-30T05:03:44+5:30

जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा , प्रदेशाध्यक्ष रंजीतकुमार दास यांच्यासह आठ वर्तमानपत्रांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.   

Assam Assembly Elections 2021 : Complaint against 8 people including J. P. Nadda & Sonowal, allegation of printing in the form of advertisement news | सोनोवाल, जे. पी. नड्डांसह ८ जणांविरुद्ध तक्रार, जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याचा काँग्रेसचा आरोप

सोनोवाल, जे. पी. नड्डांसह ८ जणांविरुद्ध तक्रार, जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याचा काँग्रेसचा आरोप

Next

गुवाहाटी :  जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा , प्रदेशाध्यक्ष रंजीतकुमार दास यांच्यासह आठ वर्तमानपत्रांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.   (Complaint against 8 people including  J. P. Nadda &  Sonowal, allegation of printing in the form of advertisement news)

काँग्रेसचा आरोप आहे की, आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अप्पर आसाममधील सर्व जागा जिंकत असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात बातमीच्या स्वरुपात छापण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन,  निवडणूक आयोगची मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आम्ही तक्रार दाखल केल्याचे काँग्रेसचे कायदा विभागाचे अध्यक्ष निरन बोरा यांनी सांगितले.

 बोरा म्हणाले की, मुख्यमंत्री सोनोवाल, भाजपाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि इतर सदस्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदारांना प्रभावित करण्यासाठी पूर्वनियोजित पद्धतीने विविध वर्तमानपत्रात बातमीच्या स्वरुपात जाहिरात छापली आहे. यामध्ये भाजप २७ मार्च रोजी पहिल्या  टप्प्यात झालेल्या अप्पर आसाममधील सर्व जागा जिंकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीने मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांच्याकडे यांच्याकडे तक्रार करत पोलिसात तक्रार दिलेल्या व्यक्ती आणि वर्तमान पत्रांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान या प्रकाराची निवडणूक आयोग चौकशी करेल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांने रविवारी रात्री दिली आहे.

Web Title: Assam Assembly Elections 2021 : Complaint against 8 people including J. P. Nadda & Sonowal, allegation of printing in the form of advertisement news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.