Anil Deshmukh resigned: शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली...आता काँग्रेसला तिसऱ्या विकेटची संधी द्या!; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:20 PM2021-04-05T16:20:39+5:302021-04-05T16:23:02+5:30

Politics After Anil Deshmukh Resigns: राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपाला सत्तेतपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. तेव्हा सत्तेचा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात साधारण महिना लागला होता.

Anil Deshmukh: opportunity to Congress after Shiv Sena, NCP for third wicket; BJP Keshav Upadhye | Anil Deshmukh resigned: शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली...आता काँग्रेसला तिसऱ्या विकेटची संधी द्या!; भाजपाचा टोला

Anil Deshmukh resigned: शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली...आता काँग्रेसला तिसऱ्या विकेटची संधी द्या!; भाजपाचा टोला

Next

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यालर मोठी आव्हानात्मक वेळ आली आहे. सव्वा महिन्याच्या अंतराने दोन मंत्र्यांना राजीनामा (two ministers  resign) द्यावा लागला आहे. यावरून भाजपाचे नेते आणि प्रवक्ते केशव उपाध्येंनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. (Now As per common minimum program, Give opportunity to Congress: Keshav Upadhye)


शिवसेना (Shivsena)झाली, राष्ट्रवादी (NCP) झाली आता राज्यातील महाआघाडी सरकारमधील  किमान समान कार्यक्रम म्हणून काँग्रेसला देखील तिसऱ्या विकेटसाठी संधी मिळायला हवी. काँग्रेसवर अन्याय होता कामा नये..., असे ट्विट केशव उपाध्ये यांनी केले आहे. 



राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यावर भाजपाला सत्तेतपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले होते. तेव्हा सत्तेचा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात साधारण महिना लागला होता. आता गेल्या दोन महिन्यांत पुजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी टाकलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या लेटर बॉम्बमुळे गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh Resigne) राजीनामा द्यावा लागला आहे. यावरून भाजपाने निशाना साधला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचे झाले आता काँग्रेसला संधी द्यावी असा टोला भाजपाने लगावला आहे. 


आजच्या घडामोडी
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते, या आरोपामुळे अनिल देशमुखांना खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं आहे, अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी ठाकरे सरकारनं माजी न्यायमूर्तींची कमिटी स्थापन केली होती, परंतु या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत हायकोर्टात सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली.

या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवला, त्यामुळे राज्यातील गृहमंत्र्यांविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, यानंतर राजकीय घडामोडींमध्ये अनिल देशमुखांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, पवारांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. मात्र आता गृहमंत्री पदाचा कारभार कोणाकडे सोपवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर आहेत.
 

Web Title: Anil Deshmukh: opportunity to Congress after Shiv Sena, NCP for third wicket; BJP Keshav Upadhye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.