"ईडीचा राजकारणासाठी वापर हे महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही"; अनिल देशमुख संतापले

By मोरेश्वर येरम | Published: December 28, 2020 04:45 PM2020-12-28T16:45:06+5:302020-12-28T16:48:08+5:30

ईडीचा जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे व त्याचा असा राजकारणासाठी वापर करणं हे महाराष्ट्रात कधी पाहिलं गेलं नाही

anil Deshmukh attacks bjp over ed notice to sanjay raut wife | "ईडीचा राजकारणासाठी वापर हे महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही"; अनिल देशमुख संतापले

"ईडीचा राजकारणासाठी वापर हे महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही"; अनिल देशमुख संतापले

Next
ठळक मुद्देगृहमंत्री अनिल देशमुख यांचा भाजपवर केला खळबळजनक आरोपकेंद्रीय तपास संस्थांचा भाजपकडून गैरवापर सुरु असल्याचं देशमुख म्हणालेएकनाथ खडसेंपाठोपाठ संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस

मुंबई
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने समन्स पाठवल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. "महाराष्ट्राच्या इतिहासात अशाप्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही", असं अनिल देशमुख म्हणाले. 

"भाजप नेत्याच्या किंवा त्यांच्या धोरणाच्या विरोधात जो कुणी बोलेल त्याच्या मागे ईडीची किंवा सीबीआयची चौकशी लावायची. सीबीआयच्या बाबतीत तर आम्ही आता निर्णय घेतलाय की आमच्या परवानगीशिवाय सीबीआयला कोणत्याही व्यक्तीची चौकशी करता येणार नाही. मात्र, ईडीचा जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे व त्याचा असा राजकारणासाठी वापर करणं हे महाराष्ट्रात कधी पाहिलं गेलं नाही", असं अनिल देशमुख म्हणाले. 

संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ही नोटीस धाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. खुद्द खडसेंनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं असून बुधवारी ते चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांच्यानंतर आता संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर थेट आरोप करत असून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका केली आहे.

Web Title: anil Deshmukh attacks bjp over ed notice to sanjay raut wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.