Anand Shinde's reply to Devendra Fadnavis, Says, This is Pawar's government. It will not fall easily | "हे पवार साहेबांचं सरकार हाय,  तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’’, आनंद शिंदेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

"हे पवार साहेबांचं सरकार हाय,  तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’’, आनंद शिंदेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

पंढरपूर - पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. (pandharpur mangalwedha vidhan sabha by election) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथील भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांचा प्रचार करताना सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे सांगत राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा दिली होती. आता गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे. (Anand Shinde's reply to Devendra Fadnavis, Says, This is Pawar's government. It will not fall easily )

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलेल्या आनंद शिंदे यांनी गाण्याच्या माध्यमातून मतदारांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचाही त्यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला. ’’हे पवार साहेबांचं सरकार हाय,  तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’’, असा टोला आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. 

एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे,नंदेश्वर, डोंगरगाव व मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असता त्यांनी हे विधान केले होते. 

दरम्यान, सत्ता बदलाचं आम्ही त्यांच्यावरच सोडलंय आम्ही. पण, त्यांनी पंढरपूरात जाऊन हे विधान केल्यामुळे प्रत्यक्ष विठोबा-माऊलीसुद्धा अत्यंत सावध झाली असेल. पण, विठु-माऊलीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. विरोधी पक्षाला अशी भाषणं करावीच लागतात. यापूर्वी आम्हीही अशी भाषणं केलेली आहेत, लोकांमध्ये उत्साह आणण्यासाठी, त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस तसे भाषण करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटलंय. या काळात सरकार पडणार, सरकार पाडणार, सरकार अस्थिर करणार हे, जेव्हा ते पाडतील तेव्हा त्यांचं अभिनंदन करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

English summary :
Anand Shinde's reply to Devendra Fadnavis, Says, This is Pawar's government. It will not fall easily

Web Title: Anand Shinde's reply to Devendra Fadnavis, Says, This is Pawar's government. It will not fall easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.