Video: ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात?

By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 01:44 PM2021-02-18T13:44:55+5:302021-02-18T13:49:26+5:30

Farmer Allegation against Shiv Sena Minister Shankarrao Gadakh: दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत

Allegation Against Shivsena Minister Shanakarrao Gadakh by Farmer, Appeal to CM Uddhav Thackeray | Video: ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात?

Video: ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात?

Next
ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहेशंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही

मुंबई – एकीकडे देशभरात कृषी कायद्यावरून गेल्या ३ महिन्यापासून शेतकरी(Farmers) आंदोलन पेटलं आहे, कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलनाला बसले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ संजय राऊत(Shivsena Sanjay Raut)यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे गेले होते, शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले आहेत. ऊसाला तोड दिली जात नसेल तर ऊस पेटवून देऊ, यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण देत असल्याचं तरूण शेतकऱ्याने म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील ऋषिकेश शेटे यांनी शेतकऱ्याच्या मरणाच्या सोहळ्याचं आमंत्रण देतोय म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, यात शिवसेना मंत्री शंकरराव गडाख(Shankarrao Gadakh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

शंकरराव गडाख हे विरोधक शेतकऱ्यांचे हजारो एकर ऊस मुद्दामहून तोडून देत नाहीत, चक्करा मारूनही ऊसतोडीची नोंद घेत नाही. शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे, शेतकऱ्यांनी या जाचाला कंटाळून ऊस पेटवून देण्याचं ठरवलं आहे, इतकचं नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली नाही तर ऊसात आत्मदहन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दुष्काळातून होरपळलेलो असताना सरकारी मदत झाली नाही, कष्टाने ऊस पिकवला तरी दीड वर्ष झाली ऊसाला तोड नाही असा आरोप या तरूण शेतकऱ्याने केला आहे.

त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्ह्याला दिलेलं मंत्रिपद आमच्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचं ठरत नाही, त्या मंत्र्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली आहे, शंकरराव गडाख हे शेतकऱ्यांना टार्गेट करतात. तुम्ही दिलेल्या मंत्रिपदाचा दुरूपयोग केला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मरणाचा सोहळा पाहण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या मंत्र्यांनी उपस्थित राहावं असं ऋषिकेश शेटे या तरूण शेतकऱ्याने सांगितले आहे.

अलीकडेच ग्रामपंचायत निवडणुका गावात पार पडल्या, शंकरराव गडाख यांच्या कारखान्यात भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्यांना प्यायला पाणी नाही म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात पॅनेल केला. जलसंधारण मंत्र्याच्या मतदारसंघात ही अवस्था आहे, या मुद्द्यावर गावात पाणी, रस्ते मिळावे यासाठी निवडणुकीत पॅनेल उभं केलं, त्यामुळे शंकरराव  गडाख यांनी ऊसाला तोड येऊ दिली नाही. ऊसाला तोड न आल्याने ऊस पूर्णपणे वाकला आहे. शंकरराव गडाख यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची अशाप्रकारे पिळवणूक केली जाते असा आरोप शेतकऱ्यांनी केला, मुळा सहकारी साखर कारखाना हा शंकरराव गडाख यांच्या अख्यारित आहे. त्यामुळे एकीकडे देशातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतेय का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

Web Title: Allegation Against Shivsena Minister Shanakarrao Gadakh by Farmer, Appeal to CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.