मुकल रॉय यांच्यानंतर भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसणार, एका मातब्बर खासदारासह तीन आमदार पक्ष सोडणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 07:49 AM2021-06-12T07:49:18+5:302021-06-12T07:50:06+5:30

West Bengal Politics: भाजपाचे राज्यातील दिग्गज नेते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर आता भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

After Mukal Roy, the BJP will face another blow in West Bengal, with three MLAs leaving the party, including one MP | मुकल रॉय यांच्यानंतर भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसणार, एका मातब्बर खासदारासह तीन आमदार पक्ष सोडणार 

मुकल रॉय यांच्यानंतर भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसणार, एका मातब्बर खासदारासह तीन आमदार पक्ष सोडणार 

Next

कोलकाता - पश्चिम बंगाल जिंकण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्यानंतर आता भाजपाच्या पक्षसंघटनेला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. (West Bengal Politics) पक्षाचे राज्यातील दिग्गज नेते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर आता भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे बंगालमधील एक खासदार आणि तीन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (After Mukal Roy, the BJP will face another blow in West Bengal, with three MLAs leaving the party, including one MP )

भाजपाचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला पक्षाचे खासदार शांतनू ठाकूर यांच्यासह तीन आमदार अनुपस्थित राहिले, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दिलीप घोष यांनी जिल्हा संघटनात्मक बैठक बोलावली होती. मात्र हे नेते या बैठकीला अनुपस्थित राहिले. मुकल रॉय यांनी पक्ष सोडून काही तास उलटत नाहीत तोच ही घटना घडल्याने भाजपाची चिंता वाढली आहे. 

शांतनू ठाकूर हे बंगालमधील प्रभावी अशलेल्या मतुआ समुदायातील एक प्रमुख सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये सीएए कायदा लागू करण्याबाबतच्या भाजपाच्या भूमिकेबाबत शांतनू ठाकूर नाराज होते. दिलीप घोश यांनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या नेत्यांमध्ये भाजपाचे तीन आमदार विश्वजित दास (बगडा), अशोक कीर्तनिया (बोनगाव उत्तर) आणि सुब्रत ठाकूर (गायघाटा) यांचा समावेश आहे.  

याबाबत विचारले अशता दिलीप घोष यांनी सांगितले की, ही बैठक पक्षाचे मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकर्त्यांबाबत उद्देशून आयोजित करण्यात आली होती. आम्ही सर्वांना निमंत्रित केले होते. खासदारांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते दिल्लीला गेले असल्याचे मला सांगण्यात आले.

Web Title: After Mukal Roy, the BJP will face another blow in West Bengal, with three MLAs leaving the party, including one MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.