भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच; छगन भुजबळ यांचे मोठे संकेत

By हेमंत बावकर | Published: December 19, 2020 05:43 PM2020-12-19T17:43:25+5:302020-12-19T17:44:23+5:30

chagan Bhujbal on MegaBharati in NCP: काही दिवसांपूर्वीच हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

70% of BJP MLAs are ours people; Big sign of NCP Chhagan Bhujbal | भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच; छगन भुजबळ यांचे मोठे संकेत

भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच; छगन भुजबळ यांचे मोठे संकेत

Next

मुंबई : राष्ट्रवादीतील मेगाभरतीवरून भाजपा आणि एनसीपीच्या नेत्यांमध्ये वाक्-युद्ध रंगले आहे. हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा फोडण्याचा इशारा दिला आहे. यावर आता छगन भुजबळ यांनी मोठे संकेत दिले आहेत. 


काही दिवसांपूर्वीच हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना 'घरवापसी'ची साद घातली.


यानंतर भाजपाने यावर टीका करण्यास सुरुवात केली. अजित पवार आणि जयंत पाटलांनी १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितल्याने भाजपाने लगेचच प्रत्यूत्तर देण्यास सुरुवात केली. तुमचे आघाडी सरकार उत्तम चालले आहे. मग का आमच्या लोकांना आकर्षित करता? तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 


आता भुजबळ यांनी भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच आहेत, असा गौप्यस्फोट करत याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असा इशारा दिला आहे. आजी माजी आमदार महाविकास आघाडीत येण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त करत जरी असतील, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाला घ्यायचे कोणाला थांबवायचे हे शरद पवार ठरवतील, असेही भुजबळ म्हणाले. 

अनेक आमदार येणार महाविकास आघाडीत, अजित पवारांचा गौप्यस्फोट
तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपाला नाकारले असे सांगून, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही त्यांनी मंगळवारी विधानसभेत म्हटले होते.

Web Title: 70% of BJP MLAs are ours people; Big sign of NCP Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.