भाजपकडील २७, काँग्रेसच्या १२ जागांवर आज मतदार देणार कौल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:52 AM2019-04-18T04:52:26+5:302019-04-18T04:53:10+5:30

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या, गुरुवारी ९५ मतदारसंघातील सुमारे १६ कोटी मतदार मतदान करणार असून, त्यात दक्षिण, उत्तर व ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे.

27 voters of BJP, voters will be present in 12 seats in the Congress | भाजपकडील २७, काँग्रेसच्या १२ जागांवर आज मतदार देणार कौल

भाजपकडील २७, काँग्रेसच्या १२ जागांवर आज मतदार देणार कौल

Next

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या, गुरुवारी ९५ मतदारसंघातील सुमारे १६ कोटी मतदार मतदान करणार असून, त्यात दक्षिण, उत्तर व ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे. या ९५ पैकी ६२ जागा केवळ तामिळनाडू, कर्नाटक व महाराष्ट्रातील आहेत. देशभर कडक उन्हाळा असल्याने सकाळी व संध्याकाळी अधिक मतदान होण्याची शक्यता आहे.
मतदारांच्या बोटावर जी शाई लावली जाते, त्यासाठी यंदाच्या निवडणुकीत तब्बल ३३ कोटींचा खर्च आला आहे. उद्याच शाईच्या २६ लाख बाटल्या लागतील. एका बाटलीतील शाई सुमारे ३५0 मतदारांपुरती असते. यंदा शाईचा खर्च खूपच वाढला आहे. देशात २00९ साली शाईवर जो खर्च झाला, त्याच्या तिप्पट खर्च यंदा झाला आहे. त्यावर्षी सुमारे ११ कोटी रुपये शाईवर खर्च झाले होते.
ज्या ९५ मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे, त्यापैकी ५८ जागा गेल्या म्हणजे २0१४ च्या निवडणुकांत प्रादेशिक पक्षांनीच जिंकल्या होत्या. या ९६ पैकी भाजपला २७ व काँग्रेसला १२ मिळाल्या होत्या. तामिळनाडूतील अण्णा द्रमुकनेच ३७ जागा जिंकल्या होत्या. शिवाय अण्णा द्रमुकच्या मित्रपक्षाने एक जागा जिंकली होती. पुडुच्चेरीमधील एक जागाही अण्णा द्रमुकनेच जिंकली होती. यंदा भाजपशी समझोता केलेल्या अण्णा द्रमुकला तितक्या जागा मिळवणे अवघड जाणार आहे. तिथे यंदा द्रमुक व काँग्रेस आघाडीचे मोठे आव्हान दिसत आहे. बिहारमध्येही गेल्या वेळी भाजपने चांगली बाजी मारली होती. यंदा त्या विजयाची पुनरावृत्ती करणे भाजपला शक्य होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकातही २0१४ साली चांगला विजय मिळवला होता. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकांतून तिथे काँग्रेस-जनता दल (से) यांचे सरकार आले. हे दोन्ही पक्ष तिथे यंदा एकत्रपणे लढत असून, त्याचा त्रास भाजपला होऊ शकेल. तामिळनाडू व कर्नाटकातील यंदाची निवडणूक गाजली ती प्राप्तिकर खात्याने विरोधी नेत्यांवर टाकलेल्या छाप्यांमुळे. तामिळनाडूमध्ये सव्वाशे कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. पण वा प्राप्तिकर खात्याने या रकमा कोणाकोणाच्या आहेत, हे स्पष्ट केलेले नाही. यंदा दारू, अंमली पदार्थ व
सोने-चांदीही प्रचंड प्रमाणात सापडली. उत्तर प्रदेशातून भाजपच्या हेमामालिनी, काँग्रेसचे राज बब्बर या बॉलिवूड कलाकारांचे भवितव्यही उद्या ईव्हीएममध्ये बंद होईल. काश्मीरच्या श्रीनगरची जागा गेल्या वेळी पीडीपीने जिंकली होती. पण पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला विजयी झाले. ते व कर्नाटकातील तुमकुरूमधून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा पुन्हा यंदा रिंगणात आहेत.
>दुसºया टप्प्यात कुठे होणार मतदान?
तामिळनाडू (३८ जागा)
अण्णाद्रमुक ३७
: कांचीपुरम्, अर्कोणम, तिरूवेल्लूर, चेन्नई उत्तर, चेन्नई दक्षिण, चेन्नई मध्य, तिरुवन्नामलई, कृष्णगिरी, श्रीपेरम्बदूर, कोर्इंबतूर, निलगिरी, इरोड, तिरुपूर, नमक्कल, सेलम, अराणी, कलाक्कुरुची, तुत्तुक्कुडी, विरुधनगर, तेनकासी, रामनाथपूरम, तेनी, तंजावूर, शिवगंगा, मदुराई, तिरुनलवेली, पोलाच्ची, करूर, डिंडीगल, पेरंबलूर, कुड्डलोर, तिरुचिरापल्ली, चिदम्बरम, नागापट्टनम, मैलादूतुरै.
पीएमके १ : धर्मपुरी
भाजप १ : कन्याकुमारी :
कर्नाटक (१४ जागा)
कॉँग्रेस ७ : कोलार, तुमकूर, चित्रदुर्ग, चिकबाळापूर, बंगळूरू ग्रामीण, चामराजनगर
जेडीएस २ : मंड्या, हसन
भाजप ६ : उडपी-चिकमंगळूर, म्हैसूर, बंगळुरू दक्षिण, बंगळूरू मध्य, बंगळूरू उत्तर, दक्षिण कन्नड
बिहार (५ जागा)
जेडीयू १ : पूर्णिया
राजद १ : बांका, भागलपूर
राष्टÑवादी १ : कठीयार
कॉँग्रेस १ : कृष्णगंज
पश्चिम बंगाल (३ जागा)
माकपा १ : रायगंज
तृणमूल १ : जलपायगुडी
भाजप १ : दार्जिलिंग
ओडिशा (५ जागा)
भाजप १ : सुंदरगढ
बीजद ४ : बारगड, आस्का, कंधमल, बोलनगीर
उत्तर प्र्रदेश (८ जागा)
भाजप ८ : अलीगढ, नागिना, आमरोहा, आग्रा, फत्तेपूरसिक्री, हाथरस, मथुरा, बुलंदशहर
आसाम (५ जागा)
एआययूडीएफ १ : करीमगंज
भाजप २ : नौगाव, मंगलडोई
कॉँगेस २ : सिलचर, आॅटोनॉमस डिस्ट्रीक्ट
छत्तीसगड (३ जागा)
भाजप ३ : कनकेर, महासमुंद, राजनंदगाव
जम्मू- काश्मीर ( २ जागा)
पीडीपी १ : श्रीनगर
भाजप १ : उधमपूर
मणिपूर (१ जागा)
कॉँग्रेस १ : इनर मणिपूर
त्रिपुरा (१ जागा)
माकपा १ : त्रिपुरा पूर्व (तहकूब)
पुद्दुचेरी (१ जागा)
एआयएनआरसी १ : पुद्दुचेरी

Web Title: 27 voters of BJP, voters will be present in 12 seats in the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.