youth girl death in train accident at Lonavala ; youth seriously injured | लोणावळ्यात रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; तरुण गंभीर जखमी 
लोणावळ्यात रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; तरुण गंभीर जखमी 

लोणावळा : खंडाळा महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रासमोर लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास डाऊन मार्गावर ही घटना घडली आहे. सदर घटना ही आत्महत्या की अपघात याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नसून, रेल्वे पोलिस याबाबत तपास करीत आहे. 
     हर्षदा संजय रोकडे  (वय-१९, रा. हांगेवावाडी, संगमनेर, अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे  नाव असून, चैतन्य मोहन सुखदेवे (वय-१९, रा. अमरावती) हा गंभीर जखमी झाला आहे. 
      मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोणावळा लोहमार्ग पोलिसांना फोन आला की खंडाळ्यातील महिला पोलिस प्रशिक्षण केंद्राजवळ साठे मिसळच्या मागे रेल्वेच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू तर एक तरूण जखमी झाला आहे. माहिती समजताच लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोहमार्गावरील तरूणीचा मृतदेह बाहेर काढून, जखमी तरुणाला उपचारासाठी तत्काळ पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.  हे दोघे अपघाताच्या ठिकाणी कधी व कशासाठी आले होते याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झाली नसून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा लोहमार्ग पोलिस करीत आहे.

Web Title: youth girl death in train accident at Lonavala ; youth seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.