फुगेवाडीत येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:32 PM2020-02-14T13:32:19+5:302020-02-14T13:33:41+5:30

मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पुणे - मुंबई महामार्गार घडला अपघात

Youth death in road accident at Fugewadi | फुगेवाडीत येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

फुगेवाडीत येथे भरधाव वाहनाच्या धडकेत तरुण ठार

googlenewsNext

पिंपरी  : भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी  रात्री पावणेबाराच्या सुमारास फुगेवाडीत येथे घडली. जीवन बालाजी कांबळे (वय ३०, रा. दापोडी. मूळ - हाडोळी, ता. चाकूर, जि. लातूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार आर. डी. तापकीर यांनी   फिर्याद दिली आहे. जीवन त्यांच्या दुचाकीवरून मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पुणे - मुंबई महामार्गावरून दापोडी येथून जात होते. जुना जकात नाका येथे वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये जीवन गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला

Web Title: Youth death in road accident at Fugewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.