जागेच्या वादावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 11:28 AM2021-06-21T11:28:05+5:302021-06-21T11:28:11+5:30

हाणामारीत लोखंडी रॉडचा वापर करून जखमी केले

Violent fighting between two groups dispute; Filing crimes against each other | जागेच्या वादावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

जागेच्या वादावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही घटनेत मूळ आरोपीसोबतच हाणामारी करण्यासाठी आलेल्या पाच, सहा जणांवरही गुन्हे दाखल

पिंपरी: जागेच्या वादावरुन दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामुर्डी येथे रविवारी ही घटना घडली.

पहिल्या घटनेत प्रवीण नवनाथ शिंदे (वय २३, रा. मामुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. गुलाब बबन म्हसुडगे, भूषण गुलाब म्हसुडगे, बाळू म्हसुडगे, सुनील म्हसुडगे, संदीप भंडलकर तसेच एक महिला (सर्व रा. मामुर्डी, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे व आरोपी यांच्यामध्ये जागेचा वाद आहे. त्यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून शिंदे यांना जखमी केले. याच्या परस्पर विरोधात गुलाब बबन म्हसुडगे (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे. प्रवीण नवनाथ शिंदे, रमेश नवनाथ शिंदे, स्वनील रमेश गायकवाड, एक महिला तसेच इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत जागेच्या वादावरूनच आरोपींनी म्हसुडगे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर प्रवीण शिंदे याने त्यांचा मुलगा भूषण याला लोखंडी रॉडने मारून जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Web Title: Violent fighting between two groups dispute; Filing crimes against each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.