बांधकाम व्यावसायिकाविरोधात फसवणुकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 05:37 PM2019-09-28T17:37:59+5:302019-09-28T17:39:59+5:30

संबंधित आरोपींनी ज्या तारखेला सदनिका ताब्यात देणे अपेक्षित होते त्या तारखेला न देता अग्रीमेंट करून दिले नाही.

under Mofa act crime registred for fraud by builder | बांधकाम व्यावसायिकाविरोधात फसवणुकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाविरोधात फसवणुकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल

Next

देहूरोड : सदनिकेचा ठरलेल्या वेळेत ताबा ना देता तसेच अ‍ॅग्रीमेंटनुसार सुविधा दिल्या नाहीत. तसेच गृहरचना संस्था नोंदणी न केली नाही. याप्रकरणी रावेत येथील बांधकाम व्यावसायिकाविरूध्द फसवणुकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शाहूराज रामराव टमके (वय ३३, रा. रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादं दिली आहे. त्यानुसार मेसर्स श्री साई इस्टेटचे भागीदार सुमित दीनदयाल अगरवाल, सचिन दीनदयाल अगरवाल, सागर ओमप्रकाश अगरवाल, मनोज ओमप्रकाश अगरवाल, संजय सत्पाल अगरवाल, नितीन सुरेंद्र अगरवाल, सचिन ओमप्रकाश अगरवाल, संदीप दीनदयाल अगरवाल (सर्व रा. रावेत) याच्याविरुद्ध फसवणूकीसह मोफा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शाहूराज टमके यांनी रावेत येथे सदनिका नोंदणी केली होती. मात्र संबंधित आरोपींनी ज्या तारखेला सदनिका ताब्यात देणे अपेक्षित होते त्या तारखेला न देता अग्रीमेंट करून दिले नाही. गृहरचना संस्था नोंदणी केलेली नाही. सदनिका धारकाची परवानगी न घेता प्रकल्पाचे आराखडे बदलले आहे. अग्रीमेंटप्रमाणे सुविधा दिलेल्या नाहीत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: under Mofa act crime registred for fraud by builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.