पवना धरणाच्या जलाशयात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 08:15 PM2019-12-15T20:15:27+5:302019-12-15T20:16:11+5:30

पवना धरणामध्ये पाेहण्यासाठी उतरलेल्या दाेन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Two tourists drown in Pavana dam | पवना धरणाच्या जलाशयात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

पवना धरणाच्या जलाशयात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

googlenewsNext

लोणावळा : पवन मावळातील पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटक युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमय दिलीप राहते ( वय २५) व तेजस रवि पांगर ( वय २२ दोघेही रा. काळाचौकी, अब्युदयनगर, मुंबई) अशी या मृतांची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी ( दि.१५) पवना धरण परिसरात अमय व तेजस हे अन्य दोन मित्रांच्या सोबत फिरायला आले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण पाण्यात पोहण्याकरिता उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडुन दोघांचा मृत्यु झाला.घटनास्थळाकडे आलेल्या इतर पर्यटकांनी अमय व तेजस यांना पाण्यातून बाहेर काढले मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक फौजदार सुनिल बाबर करत आहेत.

Web Title: Two tourists drown in Pavana dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.