two accused arrested with weapons at sus road | सुस येथे घातक शस्त्रांसहित दोन सराईत गजाआड 
सुस येथे घातक शस्त्रांसहित दोन सराईत गजाआड 

ठळक मुद्दे: हिंजवडी पोलिसांची कारवाई

हिंजवडी : मुंबई - बंगळूर महामार्गालगत रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना हिंजवडी पोलीस पथकाने दोघा सराईतांना घातक शस्त्रांसहित गजाआड केले. बुधवारी (दि. २१) सुस रस्त्यावर ही कारवाई केली. 
राहूल विठ्ठल शहाणे (वय २२, रा. शिरवळ, अक्कलकोट) आणि धर्मराज शिवलिंग येळकर (वय २२, रा. वेताळचौक, अक्कलकोट, सोलापूर) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बुधवारी रात्रीच्या सुमारास सुसखिंड जवळील सुसकडेजाणाऱ्या रस्त्यावर पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन दोघे संशयितरित्या जात होते. त्यांना पोलिसांनी हटकले मात्र न थांबता ते पळून जाऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले संशय आल्याने पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक धारदार लोखंडी तलवार आणि लोखंडी कोयता मिळून आला. दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता  यापूर्वी त्यांनी चतु:श्रृंगी आणि हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अनरूद्ध गिझे पुढील तपास करत आहेत.

Web Title: two accused arrested with weapons at sus road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.