तळेगाव ते सोमाटणे फाटा बनलाय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:31 PM2020-02-13T13:31:38+5:302020-02-13T13:39:47+5:30

अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष, दुभाजकांची दुरवस्था

From Talegaon to Somatane fata route has become dangerous | तळेगाव ते सोमाटणे फाटा बनलाय धोकादायक

तळेगाव ते सोमाटणे फाटा बनलाय धोकादायक

Next
ठळक मुद्देसिग्नल ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थितीवाहतूक पोलीस नसल्याने येथे वाहतूककोंडी; उपाययोजना करावी अशी मागणी

विलास भेगडे- 
तळेगाव दाभाडे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव ते सोमाटणे फाटा हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने धोक्याचा बनला असून, येथील लिंब फाटा हा तर मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणच्या अपघातांचे सत्र थांबता थांबेना!  मागील आठवड्यात झालेल्या विचित्र अपघातात प्रसाद शिवाजी बारगड (वय २४) या महाविद्यालयीन युवकाला प्राण गमवावे लागले. या ठिकाणी होत असलेले वाढते अपघात ही तळेगावकरांची खरी शोकांतिका आहे. 
लिंब फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला लहान खडी आणि कच साचली आहे. तळेगाव खिंडीतील विजय मारुती मंदिर येथे तीव्र उतार असल्याने वरचेवर अपघात घडत आहेत. लिंब फाटा 
येथे वाहतूक पोलिसांचा वानवा आहे. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असा इशारा फलकांची अवस्थाही तशीच आहे.
........
अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष, दुभाजकांची दुरवस्था
या भागात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना वेळच नाही. नेहमी बंद असलेले सिग्नल ही लिंब फाट्याची आता नवीन ओळख होऊ लागली आहे. विशेष म्हणजे हा फाटा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. सुसाट जाणारे डंपर, हायवा आणि चारचाकी यांना पायबंद घालणार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. लिंब फाटा येथे सर्व्हिस रोडसाठी उभारलेल्या दुभाजकांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे या ठिकाणी वरचेवर लहान-मोठे अपघात होत आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी करतात तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
..............
आवश्यक ठिकाणी असे फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. मुख्य रस्ता व सेवा रस्ता यांच्यात फारकत करणाऱ्या दुभाजकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दुभाजकावरील फारशा तुटून गेल्याने अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात वाहनचालक दुचाकीसह अडकून पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. 
२दुभाजक सुरू होत आहे हे दर्शवणारे फलकही नाहीत. लिंब फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार आहे. समोरून येणाऱ्या वाहनचालकाला अंदाज नसल्याने तळेगावकडे वळताना येथे हमखास अपघात घडतात. येथील सिग्नल ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती आहे. सिग्नल अनेकदा बंद असतो. वाहतूक पोलीस नसल्याने येथे वाहतूककोंडीही होते. उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे

Web Title: From Talegaon to Somatane fata route has become dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.