'स्वरसागर' महोत्सवात शास्त्रीय अन् लोकसंगीताचा मिलाफ रंगणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:15 PM2020-01-21T17:15:40+5:302020-01-21T17:18:53+5:30

अभिजात लोकसंगीत, भारतीय संगीत, पाश्चात्त्य संगीत सादर होणार...

'Swarasagar' Festival will combine classical and folk music | 'स्वरसागर' महोत्सवात शास्त्रीय अन् लोकसंगीताचा मिलाफ रंगणार 

'स्वरसागर' महोत्सवात शास्त्रीय अन् लोकसंगीताचा मिलाफ रंगणार 

Next
ठळक मुद्देयेत्या २३, २४ व २५ जानेवारीला कार्यक्र्माचे आयोजन शेवटच्या दिवशी म्हणजे २५ जानेवारीला गायक महेश काळे गायन

पिंपरी : औद्योगिक नगरीतील स्वरसागर संगीत महोत्सव पिंंपरी-चिंचवडला येत्या २३, २४ व २५ जानेवारीला होणार असून, ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांचे गायन, रामानंद उगले यांचे लोकसंगीत, लुई बॅक्स, जॉर्ज ब्रुक्स हे भारतीय आणि पाश्चात्त्य वादनाचे फ्यूजन सादर करणार आहेत. अभिजात लोकसंगीत, भारतीय संगीत, पाश्चात्त्य संगीत सादर होणार आहे. निगडी येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन, तसेच प्रसिद्ध गायक संदीप उबाळे, योगिता गोडबोले आणि सुनंदा राठोड यांचे मराठी सुगम संगीतदेखील या वेळी होणार आहे.  त्यानंतर शुक्रवारी लुई बॅक्स, जॉर्ज ब्रुक्स त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने भारतीय आणि पाश्चात्त्य वादनाचे फ्यूजन, श्रद्धा शिंदे यांचे कथ्थक आणि पवित्र भट यांचे भरतनाट्यम नृत्य सादर होणार आहे.  महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २५ जानेवारीला शनिवारी गायक महेश काळे गायन सादर करणार आहे. तसेच लोकशाहीर रामानंद उगले यांचा ऱ्यां महाराष्ट्राचा लोकरंग असा मराठी लोककलांचा आविष्कार सादर होणार आहे. सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे म्हणाले, स्वरसागर महोत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष आहे. महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आपली कला येथे सादर केले आहेत.

Web Title: 'Swarasagar' Festival will combine classical and folk music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.