पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 10:06 PM2021-06-19T22:06:32+5:302021-06-19T22:09:04+5:30

साक्षीदारांसोबत बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका....

Suspension action taken against the police sub-inspector for causing a disturbance in the police station | पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई

googlenewsNext

पिंपरी : भावाच्या विरोधात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होत असताना जमावाला भडकावले. याप्रकरणी विभागीय चौकशीची सुनावणी सुरू असताना सरकारी साक्षीदारासोबत बाचाबाची केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
 
प्रणिल मारुती चौगले, असे निलंबित केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चौगले हे वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना ४ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांच्या भावाच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. त्यावेळी वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता चौगले हे भुदरगड पोलीस ठाण्यात गेले. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांशी त्यांनी हुज्जत घातली. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. भुदरगड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी जमावाला शांत करीत होते. त्यावेळी चौगले यांनी जमावाला भडकावले. त्यामुळे तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी चौगले यांच्याकडील पिस्तूल जमा करून घेतले. 

दरम्यान, चौगले यांची वाकड पोलीस ठाण्यातून बदली करण्यात येऊन सामाजिक सुरक्षा पथकात नेमणूक करण्यात आली. भुदरगड पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी चौगले यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्याची सुनावणी सुरू असताना चौकशीतील सरकारी साक्षीदारांसोबत चौगले यांनी बाचाबाची करून त्यांना धमकी देण्याचा प्रकार करून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवत चौगले यांना निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Suspension action taken against the police sub-inspector for causing a disturbance in the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.