पिंपरीत येथील'अ' क्षेत्रीय कार्यालयावर शिवसेनेचा '' हंडा मोर्चा ''

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 04:30 PM2019-08-22T16:30:54+5:302019-08-22T16:31:54+5:30

'पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे', 'पाणी गळती थांबलीच पाहिजे' असा जोरदार घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला. 

Shiv Sena's 'Handa morcha on' 'A' ward Office in Pimpri | पिंपरीत येथील'अ' क्षेत्रीय कार्यालयावर शिवसेनेचा '' हंडा मोर्चा ''

पिंपरीत येथील'अ' क्षेत्रीय कार्यालयावर शिवसेनेचा '' हंडा मोर्चा ''

Next

पिंपरी - 'निगडी प्राधिकरणातील पाणीपुरवठा सुरळीत झालाच पाहिजे', 'पाणी कपात रद्द झालीच पाहिजे', 'शहरवासियांना शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे', 'पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे', 'पाणी गळती थांबलीच पाहिजे' असा जोरदार घोषणा देत शिवसेनेच्या वतीने आज गुरुवारी 'अ' क्षेत्रीय कार्यालयावर 'हंडा मोर्चा' काढण्यात आला. 
 शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बाळासाहेब वाल्हेकर, उपशहरप्रमुख अमोल निकम, पिंपरी विधानसभेच्या महिला संघटिका सरिता साने, समन्वयक भाविक देशमुख, विभागप्रमुख पार्थ गुरव, उपविभागप्रमुख विकास भिसे, महेश जाधव, शाखाप्रमुख शरद जगदाळे, दिपक कोटकर, त्रिभुवन मुल्ला, युवा अधिकारी  सागर पांढारकर, निलेश जांभळे, सचिन नागपुरे, अनुजा कुमार यांच्यासह शिवसैनिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'अ' क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दिपक कुंभार यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. 
नगरसेवक अमित गावडे म्हणाले, "पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीदेखील शहरवासियांना मुबलक आणि पुरेसे पाणी मिळत नाही. प्रभाग क्रमांक 15 मधील सेक्टर नंबर 24 ते 28 , निगडी, प्राधिकरण, निगडी गावठाण या परिसरातील पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. प्राधिकरणातील नागरिकांना पुरेसे पाणी देखील मिळत नाही"
याबाबत सातत्याने तक्रार करुन देखील त्याची दखल घेतली जात नाही. काही भागातील पाण्याच्या लाईन 'लिकेज' होत आहेत. त्यामुळे चेंबरमधील गढूळ पाणी मिसळत आहे. नागरिकांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत असून साथीचे आजार पसरण्याची भीती आहे", असेही ते म्हणाले.
प्राधिकरणातील पाणीपुरवठा दोन दिवसात सुरळीत करण्यात यावा. तक्रारींचे निराकरण करावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावडे यांनी दिला आहे.

Web Title: Shiv Sena's 'Handa morcha on' 'A' ward Office in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.