शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 02:05 PM2020-09-25T14:05:58+5:302020-09-25T14:07:09+5:30

पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात  

Shiv Sena MP Shrirang Barne meet to Union Urban Development Minister Hardeep Singh Puri | शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट

Next

पिंपरी : पुणे मेट्रोचे पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरील काम अंतिम टप्यात आहे. तर पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. केवळ केंद्र सरकारची मान्यता बाकी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो विस्तारी करणास येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी द्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली आहे. संसद भवनात मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट खासदार बारणे यांनी घेतली. यावेळी निगडीपर्यंत मेट्रोची किती आवश्यकता आहे याचे महत्व पटवून दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामाची सविस्तर माहिती मंत्री पुरी यांना बारणे यांनी दिली. 

पुणे मेट्रो रेल अंतर्गत स्वारगेट ते पिंपरी या मार्गाला केंद्र सरकारने पहिल्या टप्यात मंजूरी दिल्यानंतर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरील काम अंतिम टप्यात आले आहे. पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकपर्यंत मेट्रो सरू करावी अशी शहरवासीयांची मागणी आहे. खासदार बारणे म्हणाले, पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोला मंजूरी मिळावी. याकरिता १९ डिसेंबर २०१७ रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांना पत्र दिले होते. १० जानेवारी २०१८ रोजी केंद्रीय मंत्र्याने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून या विस्तारीकरणास मंजूरी दिल्याचे कळवले होते. २६ जून २०१९ रोजी शहरी विकास मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारने पाठविलेला विकास आराखडा स्वीकारल्याचे सांगितले.

५  फेब्रुवारी २०२० रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांने पुणे मेट्रो अंतर्गत निगडीतील भक्ती-शक्ती चौक पर्यंतच्या विस्तारिकरणास केंद्र सरकारने १०० दिवसाची प्रगती या कार्यक्रमात सहभागी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. १८ मार्च २०२० ला पून्हा शहरी विकास मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवून या विस्तारीकरणाच्या खर्चाबाबत विचारणा केली होती. ४ ऑगस्ट २०२० रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मार्च महिन्यापर्यंत येणारा खर्च, त्यांची मंजुरी व डिझाईन इतर बाबी या बाबत सहमती मागितली. महाराष्ट्र सरकारने जून २०२० मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊन  प्रस्ताव पाठवला होता.  याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शहरी विकास मंत्रालयास पत्र पाठवून कळविले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा १५५ कोटीचा हिस्सा व पहिल्याच टप्प्यात  हा  प्रकल्प घेतल्याने त्याचे अंतर  कमी असल्याने महाराष्ट्र सरकार  पहिल्या टप्प्यातील हिस्सा देण्यास तयार आहे. पुणे मेट्रो अंतर्गत पहिल्या टप्यात निगडी भक्ती-शक्ती चौकपर्यंतलवकर मंजुरी द्यावी अशी विनंती केली.''

Web Title: Shiv Sena MP Shrirang Barne meet to Union Urban Development Minister Hardeep Singh Puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.