अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात भोसरीत गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 05:21 PM2021-02-23T17:21:47+5:302021-02-23T17:23:38+5:30

तू मला आवडतेस, असे म्हणून तिला एका डोंगरावर आणि एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले..

Sexual abuse of a minor girl; Crime against 19-year-old youthin the bhosari | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात भोसरीत गुन्हा 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात भोसरीत गुन्हा 

Next

पिंपरी : लैंगिक अत्याचार झाल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. जानेवारी २०२० पासून २३ फेब्रुवारी २०२१ रोजी या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनू शिवाजी साळुंके (वय १९, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या १५ वर्षीय मुलीशी लगट केली. तू मला आवडतेस, असे म्हणून तिला एका डोंगरावर आणि एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Sexual abuse of a minor girl; Crime against 19-year-old youthin the bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.