इमारतीच्या टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; भाेसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 12:05 PM2019-12-16T12:05:02+5:302019-12-16T12:06:12+5:30

एका 55 वर्षीय आराेपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भाेसरीमध्ये घडली आहे.

sexual abouse of minor ; incident in bhosari | इमारतीच्या टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; भाेसरीतील घटना

इमारतीच्या टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; भाेसरीतील घटना

googlenewsNext

पिंपरी : धाक दाखवून बिल्डींगच्या टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. भोसरी येथे रविवारी (दि. 15) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी 55 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकराणी 32 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लियाकत अली खान (वय 55, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खान याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला धाक दाखवून बिल्डींगच्या टेरेसवर नेले. तेथे अश्लील चाळे केले. त्यास अल्पवयीन मुलीने नकार दिला. त्यामुळे तिला ढकलून देऊन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: sexual abouse of minor ; incident in bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.