ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन यांची जमीन वादाच्या भोव-यात

By admin | Published: May 30, 2017 08:49 PM2017-05-30T20:49:38+5:302017-05-30T20:49:38+5:30

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांची खंडाळा राजमाची गार्डनसमोरील सुंदरभवन हॉलिडे होमची जागा वादाच्या भोव-यात सापडली आहे.

Senior actor Rakesh Roshan's land dispute | ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन यांची जमीन वादाच्या भोव-यात

ज्येष्ठ अभिनेते राकेश रोशन यांची जमीन वादाच्या भोव-यात

Next

ऑनलाइन लोकमत

लोणावळा, दि. 30 -  ज्येष्ठ चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक राकेश रोशन यांची खंडाळा राजमाची गार्डनसमोरील सुंदरभवन हॉलिडे होमची जागा वादाच्या भोव-यात सापडली आहे. महसूल विभागाच्या अधिका-यांनी जागेचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून, बेकायदा उत्खननही थांबविण्यात आले आहे.
लोणावळा नगर परिषदेकडून जागेचा ले-आऊट मंजूर करताना सरकारी जागा व कब्रस्तानच्या जागेपैकी काही भाग हडप केल्याच्या आरोपांवरून मावळच्या महसूल विभागाने जागेचा सोमवारी पंचनामा केला. गौण खनिज उत्खननाची परवानगी न घेता सरकारी पड जागेत उत्खनन केल्याप्रकरणी कारवाई करत काम बंद करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे लोणावळ्याचे मंडल अधिकारी बजीरंग मेकाले यांनी सांगितले. 
     पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राजमाची गार्डन खंडाळासमोरील भूखंड  राकेश रोशन व अभिनेते हृतिक रोशन यांनी सुंदर भवन हॉलिडे होम नावाने खरेदी केला आहे. तेथे नगर परिषदेमधून बांधकामाचा ले-आऊट मंजूर करत संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. ले-आऊट मंजूर करताना या भूखंडाच्या पोटभागात असलेला सव्र्हे नं. 18/1 अ ही सरकारी पड आकार ही 510 चौरस मीटर जागा व सर्व्हे.नं. 18/2 या कब्रस्तानच्या 704 मीटर जागेपैकी काही जागा हडप करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. किरण गायकवाड यांनी केला आहे. या बाबतची कागदपत्रे त्यांनी माहिती अधिकारात मिळविली आहेत. 1953 सालापासून सातबारा उतारा व त्यानंतर सिटी सर्व्हेवरील दोन्ही जागा असताना सन 2017 मध्ये त्या अचानक गायब कशा होऊ शकतात. ही सरकारी जागेची लूट असल्याने उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीकडे गायकवाड यांनी दाद मागितली आहे. 
 
लोकमत वृत्ताची दखल.... 
सोमवारी मावळ महसूलचे अधिकारी व लोणावळा मंडल अधिकारी यांना सुंदर भवनच्या जागेचा पंचनामा केला. अवैध उत्खननाच्या कामाला पायबंद घातला. लोकमतने दि. 27 मे रोजीच्या अंकात ‘ले आऊट मधून सरकारी जागा गायब’  या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल शासकीय यंत्रणांनी घेत तातडीने कारवाई केली. लोणावळा नगर परिषदेनेही काम बंद करण्याची नोटीस बजावली असून, कामाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

Web Title: Senior actor Rakesh Roshan's land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.