पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी; आदिती कटारेची भारतीय वायुदलात निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 07:10 PM2021-08-23T19:10:19+5:302021-08-23T19:10:27+5:30

एअरफोर्स मध्ये देशातून ३१ जणांमध्ये आदितीचा समावेश

Pune's Leki's high-flying; Aditi Katare selected in Indian Air Force | पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी; आदिती कटारेची भारतीय वायुदलात निवड

पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी; आदिती कटारेची भारतीय वायुदलात निवड

googlenewsNext
ठळक मुद्दे पाच सप्टेंबरपासून ती हैदराबादमधील प्रशिक्षणास सुरुवात करणार

पुणे : भारतीय संरक्षण दलाच्या वायुसेनेत पिंपरी चिंचवडच्या शाहुनगरमधील आदिती कटारेची निवड झाली आहे. या कौतुकास्पद निर्णयाने पुणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स तुकडीच्या शॉर्ट सर्विस कमिशनसाठी देशभरातून ३१ जणांची निवड झाली. यात आदितीचा समावेश आहे.

आदितीचे शालेय शिक्षण चिंचवडच्या कमलनयन बजाज स्कूलमध्ये झाले असून दहावीला तिला ८९.८२ टक्के गुण मिळाले होते. सन २०१९ मध्ये तिने ८० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. गेली दोन वर्षे ती बार्कले बँकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करीत आहे. लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांच्या ॲपेक्स संस्थेतून आदितीने एस. एस. बी. मुलाखतीसाठीचे मार्गदर्शन घेतले. आदितीचे वडील कल्याण कटारे हे व्यावसायिक असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी खुल्या भागांचा पुरवठा करतात. आई मंजूषा गृहिणी आहेत. पाच सप्टेंबरपासून ती हैदराबादमधील प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.

''मुलाखतीवेळी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. ब्राह्मणकर सरांनी घेतलेल्या मुलाखतीच्या सरावाचा मला फायदा झाला. त्यांच्याकडील प्रशिक्षण आणि गटचर्चेमुळे मुद्दे सहजपणे मांडू शकले. माझ्या यशाचे श्रेय आई, बाबा आणि ब्राह्मणकर सरांना देईन. लहानपणी शाळेत असताना ऐकलेल्या कर्नल प्रकाश सुर्वे यांच्या व्याख्यानामुळे वायुदलात जाण्याची प्रेरणा मिळाली होती असं आदिती कटारे हिने सांगितलं.'' 

Web Title: Pune's Leki's high-flying; Aditi Katare selected in Indian Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.