पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यास महावितरणला टाळे ठोकू : आमदार लांडगेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 06:39 PM2019-06-12T18:39:13+5:302019-06-12T18:44:49+5:30

पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

power should not cut in monsoon : MLA Mahesh Landge | पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यास महावितरणला टाळे ठोकू : आमदार लांडगेंचा इशारा 

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत झाल्यास महावितरणला टाळे ठोकू : आमदार लांडगेंचा इशारा 

googlenewsNext

पिंपरी: पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी . येत्या दोन दिवसांत सर्व तक्रारींचे निराकरण करून वीजपुरवठा सुरळीत करा. अन्यथा येत्या शनिवारी भोसरी, बालाजीनगर येथील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला.

भोसरी मतदारसंघातील विजेच्या समस्या संदर्भात आणि पावसाळ्यात सातत्याने होणा-या खंडित वीज पुरवठ्याबाबत महावितरणचे अधिकारी, महापालिका विद्युत विभागाच्या अधिका-यांची  लांडगे यांनी बैठक घेतली. त्यात दोन दिवसांत विजेच्या सर्व समस्या मार्गी लावव्यात. महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना अधिका-यांना दिल्या.
भोसरीतील 'ई' क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीला महापौर राहुल जाधव, महावितरणचे पुणे जिल्ह्याचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता पंकज तगडपल्लेवार, कार्यकारी अभियंता राहुल गवारी, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट, 'इ' प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, नगरसेविका नम्रता लोंढे, माजी नगरसेवक भीमा बोबडे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, पांडुरंग भालेकर, परिक्षीत वाघेरे, लघुउद्योजक संघटनेचे सचिव जयंत कड, महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घुबे, प्रवीण घोडे, देशमुख उपस्थित होते.
‘‘गेल्या तीन दिवसांपासून भोसरीच्या विविध भागात वीज खंडित होण्याचा घटना घडल्या आहेत. दररोज चार-चार तास वीजपुरवठा खंडित होत आहे. परिवर्तन हेल्पलाईनवर तीन दिवसात सुमारे पाचशेतक्रारी आल्या आहेत. पावसाळ्यापूवीर्ची कामे अगोदरच पूर्ण करणे अपेक्षित होते. यापुढे फांदी तुटली, ट्रान्सफॉर्म उडाला, साहित्य नाही अशी कारणे चालणार नाहीत. नागरिकांना अंधारात ठेवू नका. पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होता कामा नाही. पावसाळ्यात दुरुस्तीच्या कामासाठी अधिकच्या कर्मचा-यांची नियुक्ती करा. पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. वीज नसेल तर नागरिकांना वरच्या मजल्यावर पाणी नेता येत नाही. उद्योजकांकडून महावितरणला अधिकचा महसूल मिळतो. काही ठिकाणाचे ट्रान्सफर 'ओव्हर' लोड झाले असून ते बदलण्यात यावेत. 

महावितरणमधील एजंटगिरी बंद करा
वडमुखवाडी, दिघीगाव, काळजेवाडी, भोसरीगाव, चिखली, तळवडे, मोशीतील प्रलंबित असलेले वीज मीटर त्वरित ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात यावेत. धोकादायक वायर 'अंडरग्राऊंड' कराव्यात. डीपी, ट्रान्सफॉर्मर झाकून ठेवा. जेणेकरुन पावसाळ्यात कोणाचा हात लागून विजेचा धक्का बसणार नाही.  पावसाळ्यात जिथे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशी ठिकाणी शोधा. तिथे अगोदरच दुरुस्तीची कामे करा. फांद्या तोडण्यासाठी महापालिकेची मदत लागल्यास ती मदत घ्यावी. महावितरणचे कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना योग्य ती समज देण्यात यावी. लोकप्रतिनिधींपेक्षा एजंटची कामे वेगात होतात.

मोईचा क्रशर मशिनचा वीज पुरवठा खंडित करा 
चाकण, मोईतील खाण खोदण्यासाठी वापरण्यात येणा-या क्रशर मशिनसाठी भोसरीतील महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. मोईकरांना  वीज पुरवठ्याची व्यवस्था करण्याची सूचना सहा महिन्यांपूर्वी दिली होती. त्यामुळे आता त्यांना दिला जाणारा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा. अशी सूचना करण्यात आली.

Web Title: power should not cut in monsoon : MLA Mahesh Landge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.