Pimpri News : हॅलो, कोरोना महामारीत फसवणूक, पिळवणूक होतेय? डायल करा पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:54 PM2021-05-11T22:54:32+5:302021-05-11T22:54:49+5:30

कोरोना महामारीचा गैरफायदा घेत नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे.

Pimpri News: Hello, Fraud, extortion in Corona epidemic? Dial the police helpline number | Pimpri News : हॅलो, कोरोना महामारीत फसवणूक, पिळवणूक होतेय? डायल करा पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक

Pimpri News : हॅलो, कोरोना महामारीत फसवणूक, पिळवणूक होतेय? डायल करा पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक

Next

पिंपरी : कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल? यासाठी मदत कशी व कुणाची घेता येईल? हा प्रश्न आहे. यासाठी पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून तसेच महासेतू सोल्युशन्स एलएलपी, ग्लोबल हयुमन ऑरगनायझेशन यांच्या समन्वयातून ‘पोलीस सॅमरिटन’ ही हेल्पलाइन शनिवारपासून (दि. १५) कार्यान्वित करण्यात येणार आहे.

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिक त्यांच्या समस्यांबाबत हेल्पलाइनवर फोन करू शकतात. कोविड सुसंगत आचरण कसे असावे? कोविड पॉझिटिव्ह असताना रुग्ण घराबाहेर वावरत असेल. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल, वेळेची मर्यादा न पाळता परवानगी नसलेली दुकाने, हॉटेल, आस्थापना सुरू असतील, अशा बाबतीत नागरिक हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकतात.

कोरोना महामारीचा गैरफायदा घेत नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णवाहिका चालक अवाजवी दर आकारत असतील. रेमडेसिविर किंवा इतर औषधांचा काळाबाजार होत असेल, कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अवाजवी पैशांची मागणी होत असेल, आंतरजिल्हा / आंतरराज्य
प्रवासासाठी बनावट पास व बनावट कोरोना अहवाल बनवले जात असल्यास हेल्पलाइनवर तक्रार नोंदवता येणार आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे होम क्वारंटाईन असल्यास औषध, जेवण, भाजीपाला याची आवश्यकता असेल, तसेच कोरोनामुळे कोणतेही लहान मूल अनाथ झाले असेल आणि त्याची जबाबदारी सांभाळण्यास कोणीही नसेल अशा प्रकारच्या मदतीसाठी नागरिक या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

बिलाबाबत महापालिकेकडे करा तक्रार
रुग्णालयातून रुग्णाला डिस्चार्ज देताना बिलाबाबतच्या कोणत्याही तक्रारीचा अंतर्भाव या हेल्पलाईनमध्ये केलेला नाही. हॉस्पिटल बिलबाबत कोणतीही तक्रार असल्यास कोविड बिल लेखा परीक्षण समिती, पिंपरी -चिंचवड महापालिका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामारीच्या काळात नागरिकांची फसवणूक होत आहे. त्याबाबत कुठे तक्रार करावी, याबाबत नागरिकांना माहिती नसते. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी मांडू शकतात.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

या क्रमांकावर साधता येईल संपर्क
८०१०४३०००७
८०१०८१०००७ 
८०१०४६०००७
८०१०८३०००७

Web Title: Pimpri News: Hello, Fraud, extortion in Corona epidemic? Dial the police helpline number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.