पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावांचा कचरा शहरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 02:03 PM2019-11-06T14:03:56+5:302019-11-06T14:07:45+5:30

कचरा संकलन करताना करावा लागतोय अडचणींचा सामना..

Pimpri Chinchwad Municipality Out side village waste garbage in city | पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावांचा कचरा शहरात

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावांचा कचरा शहरात

Next
ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाकडे पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरताओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू

पिंपरी : शहराचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कचºयाचे संकलन करताना महापालिका प्रशासन जेरीस आले आहे. असे असतानाच महापालिका हद्दीबाहेरील कचरा शहरात आणून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेला कचºयाचे संकलन करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 
चिखली येथील जाधववाडीमधील सीएनजी पंपाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कचºयातील अनेक कागदांवर हिंजवडी येथील पत्ता आहे. त्यामुळे महापालिका हद्दीबाहेरील गावांतील कचरा शहरात आणून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, कचरा नेमका कोण आणि कधी टाकते, ही माहिती मिळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. 
महापालिका प्रशासनाकडे पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शहरातील सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायाने शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कचरा संकलन एजी इन्व्हारो व बीव्हीजी या दोन कंपन्यामार्फत केले जात आहे.शिवाय ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर १०० टक्के प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 
.........
हिंजवडीतील कचरा असल्याची शंका 
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील गावे व तेथील सोसायट्यांमधील कचरा शहरात आणून टाकला जात आहे. त्यामुळे कचºयाची समस्या अजूनच जटिल होत आहे. शहरालगतच्या गावांमधून कचरा शहरातील मोकळ्या मैदानांमध्ये वाहनांमधून आणून टाकला जातो. चिखली येथे टाकण्यात आलेल्या कचºयामधील अनेक वस्तूंच्या कव्हरवर हिंजवडी येथील पत्ता आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
२दररोज सुमारे एक हजार टन कचरा निर्माण होतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाºया कचºयाचे योग्य व्यवस्थापन करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे. मात्र, अशाप्रकारे महापालिका हद्दीबाहेरील कचरा शहरात टाकला जात असल्याने समस्या वाढत आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
 

Web Title: Pimpri Chinchwad Municipality Out side village waste garbage in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.