अज्ञात वाहनाच्या धडकेत द्रुतगती मार्गावर एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:49 PM2020-02-20T12:49:23+5:302020-02-20T12:52:08+5:30

एक्सप्रेस हायवेवर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर नं. ७५/३०० जवळ पायी रस्ता ओलांडताना अशोक प्रभाकर मगर यांना भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देवून यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

One dies in accident near Express way | अज्ञात वाहनाच्या धडकेत द्रुतगती मार्गावर एकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत द्रुतगती मार्गावर एकाचा मृत्यू

Next

कामशेत : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बऊर ( मावळ ) येथील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.  घटना बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. याप्रकरणी संतोष अशोक मगर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.अशोक प्रभाकर मगर ( वय ५२, रा. बऊर, मावळ ) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ( दि.१९ ) रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस हायवेवर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर नं. ७५/३०० जवळ पायी रस्ता ओलांडताना अशोक प्रभाकर मगर यांना भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने ध=डक देवून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहेत.

Web Title: One dies in accident near Express way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.