पिंपरी चिंचवडच्या शांतता क्षेत्राबाबत महापालिका आणि पोलीस अनाभिज्ञ; कारवाई होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:10 PM2022-05-18T17:10:26+5:302022-05-18T17:10:39+5:30

शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये तसेच निवासी भाग अशा काही ठिकाणांना काही वर्षांपूर्वी शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केले

Municipal Corporation and police ignorant about Pimpri Chinchwad peace zone; Will there be action? | पिंपरी चिंचवडच्या शांतता क्षेत्राबाबत महापालिका आणि पोलीस अनाभिज्ञ; कारवाई होणार का?

पिंपरी चिंचवडच्या शांतता क्षेत्राबाबत महापालिका आणि पोलीस अनाभिज्ञ; कारवाई होणार का?

Next

नारायण बडगुजर

पिंपरी : शहरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, शासकीय कार्यालये तसेच निवासी भाग अशा काही ठिकाणांना काही वर्षांपूर्वी शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केले. महापालिकेने त्याबाबत फलक देखील लावले. मात्र, ते फलक सध्या अडगळीत आहेत. तसेच या क्षेत्रात शांतता भंग होत असूनही त्याबाबत कारवाई होत नाही. त्यासाठी यंत्रणा असल्याचेही दिसून येत नाही.

शहरात विविध कार्यक्रम, सोहळे होतात. त्यात डीजेसह इतर वाद्ये वाजविली जातात. तसेच शहरातील बहुतांश अंतर्गत रस्तेही प्रशस्त असून वाहने दामटली जातात. त्यामुळे हाॅर्न व रहदारीमुळे होणारे ध्वनीप्रदूषण शांतता क्षेत्रात आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होते. 

पोलीस आयुक्तालय झाले, आढाव्याचे काय?

पिंपरी-चिंचवड शहरासाठी २०१८ मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, त्यानंतर एकदाही महापालिका आणि पोलिसांकडून शांतता क्षेत्रांबाबत आढावा घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील शांतता क्षेत्र किती आहेत, याची अद्ययावत माहिती उपलब्ध होत नाही. 

कोट्यवधींच्या रुग्णालयासाठी नाही हजाराचा फलक

महापालिकेतर्फे शहरात पिंपरीगाव, भोसरी, चिंचवडगाव, थेरगाव आदी ठिकाणी सुसज्ज रुग्णालयांची उभारणी करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र या रुग्णालयांच्या परिसरात शांतता क्षेत्राचे फलक लावण्यात आलेले नाहीत. यावरून प्रशासनाची उदासीनता दिसून येते. 

फलक अतिक्रमणाच्या विळख्यात

महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाच्या बाहेर शांतता क्षेत्राचे फलक आहेत. मात्र हे फलक अडगळीत आहेत. या फलकांना अतिक्रमणांचा विळखा आहे. त्यामुळे हे फलक सहज दिसून येत नाहीत. शहरातील इतर ठिकाणच्या बहुतांश फलकांची अशीच दुरवस्था झाली आहे. काही फलक जीर्ण झाले आहेत. 

ठळक माहितीची आवश्यकता

शांतता क्षेत्राचा फलक मोठा असवा तसेच त्यावर माहिती व सूचना ठळकपणे नमूद केलेली असातवी. तसेच संबंधित फलक दर्शनी भागात वाहनचालक व नागरिकांना सहज दिसून येईल अशा पद्धतीने लावणे आवश्यक आहे. 

शहरात शांतता क्षेत्र नेमके किती?

शहरात काही ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आणि रहिवासी भाग एकाच परिसरात असल्याचे दिसून येते. यातील सध्या किती ठिकाणी शांतता क्षेत्र आहेत याची अद्ययावत नोंद प्रशासनाकडे नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत दरवर्षी आढावाही घेतला जात नाही. 

शांतता क्षेत्रात मर्यादा किती?

नियमानुसार शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्रीला ४० डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तर रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्रीला ४५ डेसिबल, विपणन क्षेत्रात दिवसा ६५ तर रात्रीला ५५ डेसिबलची मर्यादा आहे. मर्यादेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई होऊ शकते. 

दंडात्मक कारवा्ईसह तरतूद

सर्वोच्य न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन १९८६ व ध्वनीप्रदूषण अधिनियम २००० मधील तरतुदींचे सक्‍त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार रात्री दहापासून सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्‍त बंदी आहे. सकाळी सहापासून रात्री दहापर्यंतसुदधा लाऊडस्पीकर, फटाके, वाद्ये आदींवर मर्यादा आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास ५ वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. यानंतरही गुन्हे सुरू राहिल्यास प्रत्येक दिवसाला ५ हजारांचा दंड व ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

एकावरही नाही कारवाई

शहरात विविध कार्यक्रमात डीजे वापरला जातो. हे महापालिका, पोलीस प्रशासनालाही माहीत आहे. मात्र कारवाई एकावरही झाली नाही.

Web Title: Municipal Corporation and police ignorant about Pimpri Chinchwad peace zone; Will there be action?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.