पिंपरीत भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 05:34 PM2020-03-10T17:34:15+5:302020-03-10T17:37:40+5:30

सीसीटीव्ही बसविण्याचा वाद; परस्परविरोधी तक्रार

Molestation crime filed against husband of BJP women officer in Pimpri | पिंपरीत भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा

पिंपरीत भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप महिला पदाधिकाऱ्यासह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल 'दोन दिवसात तुम्हाला कापून टाकतो', अशी धमकी

पिंपरी - सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून भाजप महिला पदाधिकाऱ्याने मारहाण केली.तसेच त्यांच्या पतीने एका महिलेचा विनयभंग केला. याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ८) दुपारी मासुळकर कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे.
एका २७ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भाजप महिला पदाधिकाऱ्यासह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाजप महिला पदाधिकारी आपल्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवत होत्या. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमऱ्याचे तोंड त्यांच्या शेजारच्या घराकडे केले. त्याला शेजाऱ्यांनी आक्षेप घेतला. या कारणावरून झालेल्या भांडणात भाजप महिला पदाधिकाठयाने फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करीत ठिकठिकाणी ओरबाडले, तर त्यांच्या पतीने संबंधित महिलेचा विनयभंग केला. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांची आई, बण यांना त्या पदाधिकारी महिलेने काठीने मारहाण केली.
फिर्यादींच्या वडिलांना पदाधिकारी महिलेच्या सासऱ्याने मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत. या घटनेच्या परस्पर विरोधी फिर्याद संबंधित भाजप महिला पदाधिकाऱ्याने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी पाईपने मारहाण करीत फिर्यादी भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या चारित्र्याबाबत अश्लिल शब्द वापरले. तसेच आरोपी हातोडी घेऊन मारहाण करण्यास धावून आले. 'दोन दिवसात तुम्हाला कापून टाकतो', अशी धमकी देखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Molestation crime filed against husband of BJP women officer in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.