पुरस्काराने जन्माचे सार्थक- रूपकुमार राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 02:49 AM2019-03-10T02:49:47+5:302019-03-10T02:50:02+5:30

चिंचवड येथे रंगला आशा भोसले पुरस्कार सोहळा

Meaning of Birth - Rakkumar Rathod | पुरस्काराने जन्माचे सार्थक- रूपकुमार राठोड

पुरस्काराने जन्माचे सार्थक- रूपकुमार राठोड

Next

पिंपरी : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ज्या व्यासपीठावर सन्मान मिळाला, त्याच व्यासपीठावर गौरव होणे ही भाग्याची गोष्ट आहे. सात जन्मांचे पुण्य फळाला आले आहे. गानसरस्वती आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार मिळाला. जीवनाचे सार्थक झाले, असे भावोद्गार प्रसिद्ध संगीतकार आणि गायक रूपकुमार राठोड यांनी काढले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे १७वा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांना प्रदान करण्यात आला. एक लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी व्यासपीठावर महापौर राहुल जाधव, ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष राजेशकुमार सांकला, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाट्य परिषद शिरूर शाखाध्यक्ष दीपाली शेळके, तळेगावप्रमुख सुरेश धोत्रे, अभिनेते सुशांत शेलार आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना रूपकुमार राठोड म्हणाले, ‘‘संगीताची पूजा आणि गौरव करणारे चिंचवडगाव आहे. संगीताच्या माध्यमातून सेवा करण्याचे काम करीत आहे. संगीताच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त करायला मिळते, ही मोठी संधी आहे.’’ महापौर जाधव म्हणाले, ‘‘शहराचा सांस्कृतिक वारसा आणि वसा जपण्याचे काम नाट्य परिषदेने केले आहे. सांस्कृतिक जडणघडणीत नाट्य परिषदेचे योगदान आहे.’’ राजेशकुमार सांकला यांनी आभार मानले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले.

लतादीदींनी आम्हाला प्रेझेंट केले नाही
मंगेशकर यांनी एक खंत व्यक्त केली. लतादीदींनी मला, आशाताई, मीनाताई, उषाताई यांना कधी पे्रझेंट केले नाही. आम्हाला गायक म्हणून सादर केले नाही. मात्र, रूपकुमारांच्या मुलीला केले. त्यावरून ती किती आश्वासक गायिका आहे, हे दिसून येते, असे गौरवोद्गार काढले.

राठोड यांचे सांगीतिक घराणे
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी रूपकुमार यांच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘राठोड यांचे सांगीतिक घराणे आहे. त्यांच्या कुटुंबात संगीत परंपरा आहे. वयाच्या तिशीपर्यंत तबलावादनाचे काम करून पुढे उत्तम गायक आणि संगीतकार अशी कारकीर्द त्यांनी घडविली आहे. रूपच्या प्रेमप्रकरणापासून संगीतातील यशाचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या पत्नी सुनाली राठोड याही गायिका आहेत. मुलगी रिवा ही आधुनिक पिढीची आश्वासक गायिका आहे.’’

पुरस्कार सैनिकांना अर्पण
राठोड यांनी कार्यक्रमात बहार आणली. ‘तू ही तो जन्नत मेरी...’ हे गाणे सादर करून दाद घेतली. रिवा राठोड यांनी ‘अलबेला सजन आयो रे...’ हे गीत सादर करून रसिकांची दाद घेतली. ‘सरहद पर तनाव है क्या, पता करो चुनाव है क्या’ हा शेर पेश करून राठोड यांनी शहिदांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पुरस्कारासाठी मिळालेले मानधन सैनिक निधीसाठी देण्याचे जाहीर केले.

Web Title: Meaning of Birth - Rakkumar Rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.