The man suddenly pulled out a revolver who came from Mercedes; fear in citizen | मर्सिडिजमधून आलेल्या 'त्या'ने अचानक काढली रिव्हॉल्वर; नागरिकांना फुटला घाम

मर्सिडिजमधून आलेल्या 'त्या'ने अचानक काढली रिव्हॉल्वर; नागरिकांना फुटला घाम

पिंपरी : मर्सिडीस मधून आलेल्या व्यक्तीने रिव्हॉल्वर दाखवून गहुंजेतील गृहसंस्थेत दहशत माजविली. अचानक बंदुक काढल्याने उपस्थित नागरिक सैरावैरा पळू लागले. या प्रकरणी चौघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली.

प्रदीप जयप्रकाश सिंग (रा. लोढा बेलमेंडा, गहुंजे, मावळ), सोमनाथ शंकर ढेरे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, ता. हवेली), चंदनसिंग सुरेंद्र सिंग (वय ३२, रा. डांगे चौक, चिंचवड), अरमान कैलास बिडलान (वय २३, रा. संगमित्रा हाऊसिंग सोसायटी, निगडी ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आकाश सुखदेव ननावरे (वय २०, रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी ३० नोव्हेंबरच्या रात्री लोढा बेलमेंडो सोसायटीत येऊन फिर्यादीचा मित्र प्रणव पुसावले याला धमकी देत होते. फिर्यादी चंदनसिंग यास त्यावरुन समजावून सांगत होता. त्यावेळी चंदनसिंग याने प्रदीप सिंग यास फोनवरुन बोलावून घेतले. त्यावेळी तो मर्सिडीस कारमधून आला. त्याच्यासोबत दुसऱ्या चारचाकी वाहनाने सात जण आले. सोबत आलेल्या व्यक्तींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर प्रदीप सिंग याने बंदूक दाखवून दहशत निर्माण केली. त्यामुळे सोसायटीमधील रहिवासी सैरावैरा धावू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The man suddenly pulled out a revolver who came from Mercedes; fear in citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.